नाशिकमध्ये राष्ट्रवादीत पदासाठी चुरस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात संघटनात्मकपदासाठी चुरस आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार दिलीप बनकर, विष्णुपंत म्हैसधुणे, श्रीराम शेटे आदी नावांची चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. निरीक्षक पाठवून कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जात आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा असल्याने जिल्ह्यातील पदासाठी इच्छुक कामाला लागले आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार जयवंत जाधव यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, स्वतः जाधव यांनी आपण इच्छुक नसल्याचे म्हटले आहे.
Web Title: competition for NCP post in nashik politics