तंत्रज्ञानाच्या युगात संगणकच झाला शिक्षक!

तंत्रज्ञानाच्या युगात संगणकच झाला शिक्षक!

जळगाव - भारतात शिक्षकांना गुरू मानले जाते. समाजाचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या शिक्षकांचा सन्मान म्हणून ५ सप्टेंबरला शिक्षकदिन साजरा करण्यात येतो. मात्र समाजाला वळण लावून जडणघडण करणारे, संस्काराचे पाठ शिकवणारे समाजाचे शिल्पकार असलेल्या शिक्षकांची जागा आता तंत्रज्ञानाच्या संशोधनातील उपकरणांनी घेतलीय. संगणक हा त्यापैकीच एक गुरू. 

आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाने सगळीकडे आपली स्वतंत्र अशी जागा मिळविली आहेत. यामुळेच प्रत्येकाचा ‘गुरु’ आता बदलताना दिसत आहे. एकेकाळी कुणाला काही अडचणी आल्यास परिसरातील उच्चशिक्षित व्यक्तींचा सल्ला घेतला जात असे. आता मात्र चित्र उलट झाले आहे कोणाला काहीही अडचणी आल्या की लोक खासकरून तरूणाई संगणक आणि इंटरनेटच्या मदतीने काही सेकंदातच आपल्या समस्या दूर करताना दिसतात.  आज प्रत्येक क्षेत्रात संगणक ‘वन मॅन आर्मी’ सारखाच उपयोगात येत आहे.

संगणक नवा गुरू

एकेकाळी तंत्रज्ञानाने संगणकाला बनवले होते. आज मात्र विज्ञानाच्या संपूर्ण कारभाराला संगणकानेच सांभाळून ठेवले आहे. संगणकामुळे मोठमोठ्या फाईलींचा गठ्ठा कमी झाला आहे. प्रत्येक गोष्टींची माहिती संगणकात गुप्त पासवर्ड लावून साठवता येते. जगातील कुठलीही व कोणतीही माहिती आपल्याला काही सेकंदात संगणक उपलब्ध करून देतो. मात्र प्रत्येक गोष्टींप्रमाणे संगणकाचेही दुष्परिणाम आहेतच. हे दुष्परिणाम होत असले तरी वास्तव मात्र हेच आहे की संगणकाशिवाय हे युग ठप्प होऊ शकते. यामुळेच की काय संगणक हाच आताच्या पिढीचा नवा ‘गुरू’ झाला आहे.

संगणक हा अत्याधुनिक युगातील चालत्या- बोलत्या शिक्षकाची भूमिका निभावतो आहे आणि हा असा एकमेव शिक्षक आहे ज्याला सर्व ज्ञान अवगत आहे व तो ज्याला जे हवे तेच नेमके देत असतो. आज संगणक अनेक पिढ्यांना घडवत आहे. नोकरीसाठीही संगणकज्ञान आवश्‍यक झालेले आहे. म्हणून संगणकाचा ‘गुरू’ म्हणून आदर केला तर वावगे ठरणार नाही.

- राजेश परदेशी, शिक्षक (नेटव्ह्यू कॉम्प्युटर, जळगाव)

एक साधन म्हणून आलेले संगणक कधी आपले शिक्षक बनले, हे समजलेच नाही. आज पहिलीपासून उच्चशिक्षणापर्यंतचे शिक्षण हे संगणकाच्या माध्यमातून दिले जात आहे. त्यामुळे संगणक हेच आपले आधुनिक शिक्षक बनले आहेत आणि हीच काळाची गरज आहे.

- प्रेरणा सहारे (विद्यार्थिनी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com