सन्मानाने आघाडी न झाल्यास काँग्रेस आजमावणार स्वबळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी महिनाभरापूर्वी आघाडीची घोषणा करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीचे सूत अजूनही जुळलेले नाही. धर्मनिरपेक्ष पक्षांना विरोध करण्यासाठी आघाडी होणे आवश्‍यक आहे; परंतु काही जागांवर एकमत होत नाही. आघाडी न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसने केल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी आज सांगितले.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी करण्याबाबत स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. त्यानुसार दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. १२२ पैकी निम्म्या जागा लढविण्यावर एकमत होत असल्याचे आघाडी करताना मित्रपक्षांना काही जागा दिल्या जाणार आहेत. ‘माकप’सोबत चर्चा सुरू असल्याचे श्री. आहेर यांनी सांगितले. शहरातील काही जागांबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याने आघाडीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. ज्या जागांवर एकमत होत नाही तेथे मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी काँग्रेसची असल्याचे श्री. आहेर यांनी सांगितले. सन्मानाने आघाडी न झाल्यास काँग्रेस स्वबळावर लढेल, असेही श्री. आहेर यांनी घोषित केले. दरम्यान, काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अधिक असून, आतापर्यंत २२८ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यापैकी १३८ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. आघाडीची चर्चा फिसकटल्यास सर्व जागा काँग्रेस लढविणार असल्याचे आहेर यांनी सांगितले. या वेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. सुचेता बच्छाव, उद्धव पवार, माजी महापौर गुलाम शेख, वसंत ठाकूर उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र

जुने नाशिक - रामकुंड परिसरातील कपालेश्‍वर पोलिस चौकीशेजारी असलेले बोरीचे झाड आज दुपारी कोसळल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले. या...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

व्यावसायिक धास्तावले; पूर पाहण्यासाठी गर्दी पंचवटी - काल (ता. १९) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज जलसंपदा विभागाने...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पूर्वसंध्येला बळीराजाची तयारी; मातीच्या बैलांनाही मागणी नाशिक - वर्षभर शेतीसाठी अपार कष्ट करून आपला मळा फुलविणाऱ्या सर्जा-...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017