नाशिकमध्ये नगरसेवकाची व्यवस्थापकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नाशिक - नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी येणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारांसाठी शासकीय विश्रामगृहातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असणारी खोलीची मागणी करणारे नगरसेवक गजानन शेलार यांनी तेथील व्यवस्थापकाला शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी शेलार यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार रामदास तडस नाशिकमध्ये कार्यक्रमाला येणार होते. त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृहातील एक खोलीही आरक्षित केली होती. काल (ता. 13) राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार व काही कार्यकर्त्यांनी खासदार तडस यांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी देण्यात येणारी खोली देण्याची मागणी केली. विश्रामगृहाचे व्यवस्थापक संपत चौधरी, अशोक देवळे यांनी खोली देण्यास नकार दिल्याने येऊन नगरसेवक गजानन शेलार यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.

Web Title: corporator beating manager