चोपडाचे लाचखोर सहायक फौजदार जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

चोपडा : शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार भास्कर राजधर ठाकूर (वय 57) त्यांच्याकडे असलेल्या एका गुन्ह्यातील वाहन सोडविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांना लाचुलचपत प्रतिबंधक खात्याच्या (ACB) जळगावच्या पथकाने ताब्यात घेतले. आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजता दोन हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले. 

चोपडा शहरा पोलिस ठाण्याचे भास्कर ठाकूर यांच्याकडे गुरे वाहणारे चारचाकी वाहन एका गुन्ह्यात जप्त होते. संबंधित तक्रारदाराने सदर वाहन सोडविण्यासाठी मेहेरबान न्यायालयातून परवानगी आणूनसुध्दा सहायक फौजदार ठाकूर याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.

यासंदर्भात तक्रारदाराने जळगावच्या लाचुलचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. त्यावरून आज सकाळी 11 वाजता चोपडा शहरात 'ACB' चे पोलिस उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला. दोन हजार रुपयांची लाच घेताना सहायक फौजदार ठाकूर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यासंदर्भात चोपडा शहरात शासकीय व निमशासकीय अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.