‘मोहेंजोदारो’च्या दागिन्यांची महिलांमध्ये क्रेझ
‘मोहेंजोदारो’च्या दागिन्यांची महिलांमध्ये क्रेझ

‘मोहेंजोदारो’च्या दागिन्यांची महिलांमध्ये क्रेझ

तांबे, चांदी, सोने स्वरूपातील अनोखी रेंज - सराफांकडूनही विशेष कलेक्‍शन सादर

नाशिक - इसवीसनपूर्व २७०० ते १५०० दरम्यान वसलेल्या या मोहेंजोदारो संस्कृतीचे अवशेष सन १९२० च्या सुमारास सापडले होते. इतक्‍या पुरातन संस्कृतीवर आधारित मोहेंजोदारो चित्रपट सध्या सर्वांचे आकर्षण ठरतोय. चित्रपटात त्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या दागिन्यांवर विशेष मेहनत घेतली आहे. या दागिन्यांची क्रेझ सध्या महिलांमध्ये दिसून येत असल्याचे चित्र आहे.

लाहोर-मुलतान रेल्वेमार्गाचे काम सुरू असताना हडप्पा आणि मोहेंजोदारो या दोन नगरींचे अवशेष सापडले होते. या संस्कृतीवर आधारित हा चित्रपट असून, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी यासाठी खूप अभ्यास केला. याबाबत मोठी चर्चा होती. शंभर कोटींच्या बिग बजेट असलेल्या या चित्रपटासाठी त्या काळाला साजेशा सर्व गोष्टी रेखाटताना दागिन्यांवर विशेष भर देण्यात आलाय. त्या काळातील ॲन्टिक असे दागिने २०१६ मध्ये आवडत आहेत, याचे आश्‍चर्य आहे. ताम्रयुगीन संस्कृतीतील घडणावळीवर आधारित हे दागिने आताच्या काळातील जीन्सपासून स्कर्टपर्यंत सर्वांवर शोभून दिसणारे असल्याने सर्व स्तरांतील महिलांचे ते विशेष आकर्षण ठरते आहे. पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स अर्थात, ‘पीएनजी’तर्फे या दागिन्यांचे विशेष कलेक्‍शनही बाजारात दाखल झाले आहे. त्याच्या महोत्सवाला महिला आवर्जून हजेरी लावत आहेत. दागिन्यांचा आकार, वजन व जुनी घडणावळ या सर्व वैशिष्ट्यांमुळे चित्रपटाचे भवितव्य १६ ऑगस्टला उजेडात येणार असले, तरी त्यातील दागिन्यांची चलती मात्र सणासुदीला दिसून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com