उघड्यावर बसणारे पाच जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

महापालिकेची दुसऱ्या दिवशीही कारवाईच्या धाकाने अन्यत्र सामसूम
धुळे - अलहेरा हायस्कूलच्या परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर आज महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली. पाच जणांना पथकाने पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, अन्य ठिकाणी कारवाईच्या धाकाने आज कुणीही फिरकले नसल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला.

महापालिकेने कालच्या कारवाईत अशा पंचवीस जणांना थेट पोलिसांच्या हवाली करून त्यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही केली. दुसऱ्या दिवशी आज अलहेरा हायस्कूलच्या परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्या गुलाब कमर, महम्मद सलमान महम्मद शकीर, रहीम उस्मान अन्सारी, शेख अकिल शेख हसन व इक्‍बाल सय्यद शगीर या पाच जणांना ताब्यात घेत पथकाने आझादनगर पोलिसांच्या हवाली केले. त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन यापुढे असा प्रकार न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली.  पोलिसांच्या मदतीने सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक साईनाथ वाघ, सादिक सिकंदर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अन्य ठिकाणी सामसूम
पथकांनी काल मोगलाई भागातील जगदीशनगर, फायर स्टेशनजवळील नदी किनारी, मोठा पूल, मोहाडी, रेल्वे रुळालगत, ऐंशी फुटी रस्ता आदी ठिकाणी कारवाई केली होती. या ठिकाणी आज उघड्यावर शौचास बसणारे फिरकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्र

जुने नाशिक - रामकुंड परिसरातील कपालेश्‍वर पोलिस चौकीशेजारी असलेले बोरीचे झाड आज दुपारी कोसळल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले. या...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

व्यावसायिक धास्तावले; पूर पाहण्यासाठी गर्दी पंचवटी - काल (ता. १९) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज जलसंपदा विभागाने...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पूर्वसंध्येला बळीराजाची तयारी; मातीच्या बैलांनाही मागणी नाशिक - वर्षभर शेतीसाठी अपार कष्ट करून आपला मळा फुलविणाऱ्या सर्जा-...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017