बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

नाशिक - चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संशयित सुभाष झंवर यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ दिवसांची

नाशिक - चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संशयित सुभाष झंवर यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ दिवसांची
पोलिस कोठडी सुनावली. संशयिताच्या कुटुंबीयांना जमावाकडून झालेल्या मारहाणीच्या पार्श्‍वभूमीवर आज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने न्यायालयास छावणीचे स्वरूप आले होते. बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी झंवर याच्यावर नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी झंवर यास बेदम मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर काल (ता. 12) न्यायालयाच्या आवारात त्याच्या कुटुंबीयांना जमावाने मारहाण केली होती.
Web Title: crime in nashik