नोटाबंदीने समांतर अर्थव्यवस्था खिळखिळी - प्रकाश पाठक

नोटाबंदीने समांतर अर्थव्यवस्था खिळखिळी - प्रकाश पाठक

नाशिक - केंद्र सरकारकडे काळ्या पैशाबाबत निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी विविध पातळ्यांवरील अघोषित उत्पन्नासह काळा पैसा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नोटाबंदीमुळे काळ्या पैशांद्वारे निर्माण झालेली समांतर अर्थव्यवस्था मोडकळीस येण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशनचे कार्यवाह प्रकाश पाठक यांनी केले.

श्री समर्थ बॅंकेचे संस्थापक मधुकर कुलकर्णी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ पाठक यांचे ‘नोटाबंदी व काळा पैसा’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. बॅंकेचे उपाध्यक्ष मकरंद सुखात्मे, मिलिंद कुलकर्णी, माजी खासदार माधवराव पाटील उपस्थित होते. 

मोदींसाठी काळा पैसा हा मुद्दा अग्रेसर असल्याचे सांगून श्री. पाठक यांनी उत्पन्न सादर न करणाऱ्या व्यक्तींना वारंवार या योजनेद्वारे मुदतीही दिल्या. मात्र, या योजनांना न जुमानणाऱ्यांना या नोटाबंदीचा दणका खऱ्या अर्थाने बसल्याचा दावा केला. त्यामुळे बाजारातील अघोषित पैसा अधिकृत होण्यास मदत झाल्याचे मत त्यांनी मांडले. केंद्राच्या नोटाबंदीचा सर्वांत मोठा फटका अनेक वादग्रस्त स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि चित्रपटसृष्टीला बसला. या दोन्ही ठिकाणी परदेशातून आलेला तसेच देशांर्तगत काळा पैसा वापरला जातो. देशभरातील दहा हजार एनजीओंना आपले उत्पन्नाचे स्त्रोत सांगता न आल्याने त्यांची दुकानदारीदेखील बंद करावी लागल्याचा दावा त्यांनी केला. 

काळ्या पैशाचे प्रमाण
प्राप्तिकरदात्यांचे प्रमाण केवळ चार टक्के
चलनात दोन लाख कोटी काळ्या पैशाची शक्‍यता
सोने, स्थावरमध्ये काळा पैसा सर्वाधिक
केवळ नोटाबंदीने काळा पैसा संपणार नाही
रिअल इस्टेटमधील ५२ टक्के काळा पैसा कसा हुडकणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com