नोटाबंदीपुरती अर्थक्रांती मर्यादित नाही - बोकील

anil-bokil
anil-bokil

नाशिक - नोटाबंदीपुरती अर्थक्रांती मर्यादित नाही, असे स्पष्ट करुन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे प्रणेते अनिल बोकील यांनी आज येथे "जीएसटी' करप्रणाली पुरेशी नाही, असे सांगितले. चलनाला अवरोध निर्माण केला असला, तरीही निर्मितीचा प्रश्‍न कायम आहे. म्हणून कर व्यवस्थेत बदल करावे लागतील. त्यासाठी "जीएसटी' योग्य नसून स्वतंत्र करप्रणाली करावी लागेल, अशीही भूमिका त्यांनी मांडली.

महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये श्री. बोकील म्हणाले, की सळसळत्या तरुणाईचे निघणारे मोर्चे हे आरक्षणापुरते मर्यादित नव्हते हे पक्के ध्यानात ठेवावे लागेल. अशा परिस्थितीत देश घुसमटीतून येतोय. "डिजीटल मनी'तून पैसा बॅंकेत जाईल आणि तो इतरांना मिळेल. पण आम्हाला एकाही व्यक्तीचे नुकसान मान्य नाही. घटनेद्वारे बदल हवेत. मुळातच, जगात दोन टक्के व्याजाने कर्ज मिळते आणि साडेआठ वर्षात परतफेड होऊन "डबल मॉर्गेज' होते. आपल्या देशात दहा टक्के व्याजदराचे कर्ज फेडण्यासाठी साडेअकरा वर्षे लागतात आणि "डबल मॉर्गेज'साठी वीस वर्षे लागतात. या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल.

विकासदरात होणारे घसरण
विकासदर दोन टक्‍क्‍यांनी घसरणार हे खरे आहे. पण तो आपणाला परवडणारा आहे. त्यातून देशात मंदी येऊ शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, की नोटा डिजीटल होतील. कर्ज स्वस्त होतील. म्हणूनच आपल्या तरुणांना निश्‍चित काय हवे? याचे सर्वेक्षण व्हायला हवे. सध्याचे "मॉडेल' हे दुरुस्ती आहे. विचारवंत आणि तरुणांच्या प्रतिभेतून विकासाचे "मॉडेल' मिळू शकेल असे वाटते. शिवाय सोन्यात गुंतलेले पैसे अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी तीस ते चाळीस ग्रॅमच्या पुढील सोन्याचे बॅंकांमध्ये साठ टक्के "मॉरगेज व्हॅल्यू' होईल असा निर्णय घ्यावा लागेल.

भ्रष्टाचार व्हावा लागेल कमी
काळा पैसा भारतात फिरतो आहे. भ्रष्टाचार कमी झाल्यास "एफडीआय'च्या तुलनेत देशात पैसा स्थीर होईल. त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी मजा करता येणारी शहरे वसवावी लागतील. त्यासंबंधीचा आराखडा आम्ही करत आहोत, असेही श्री. बोकील यांनी सांगितले. संयोजिका आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रा. सुहास फरांदे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्‌ यांनी श्री. बोकील यांचे स्वागत केले. अनिल भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. मिलींद कुलकर्णी यांनी परिचय करुन दिला.

आरोग्य अन्‌ शिक्षणविषयक सुधारणा
आमदार फरांदे यांनी आरोग्य व शैक्षणिक सुधारणांविषयक उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना श्री. बोकील यांनी दिलेले उत्तर असे -
- नोकरीसाठी जागतिक दर्जाच्या देशातील समान अभ्यासक्रमात बारावी उत्तीर्ण हा असावा पाया
- सर्वांचे वेतन दरमहा 50 हजार करत पद्दोन्नतीसाठी खात्यातंर्गत परीक्षा व्हाव्यात
- जगासाठी अन्नधान्याची व्यवस्था करत आरोग्यसंवर्धन करुन जगाकडून घेता येईल सर्वकाही विकत
- उद्योगांना प्रक्रियांकडे नेत सुधारण करण्यासह सर्व व्यवस्थेसाठी लागतील 15 वर्षे
- ज्येष्ठांच्या ठेवींवर व्याजदराचे संरक्षण सरकारला स्वतः लागेल द्यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com