ऐन थंडीत सुकामेव्याकडे ग्राहकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नोटाबंदीमुळे तीस टक्‍क्‍यांनी उलाढालीत घट
नाशिक - नोटाबंदीमुळे सुकामेवा व्यवसायालाही मोठा फटका बसला असून, उलाढाल सुमारे 30 टक्‍क्‍यांनी मंदावली आहे. परंतु, आता हळूहळू पुन्हा या बाजारातील उलाढाल पूर्वपदावर येईल, असा विश्‍वासही विक्रेत्यांनी व्यक्त केला.

हिवाळ्यात सुकामेव्याला मोठी मागणी असते. हिवाळ्यात पौष्टिक लाडू; तसेच इतर पदार्थ करण्यासाठी सुकामेव्याचा मोठा वापर होतो. सध्या काजू 880 ते एक हजार 200 रुपये किलो आहे. बदाम 560 ते 720 रुपये, पिस्ता 750 ते एक हजार 40 रुपये, अंजीर 450 ते 700 रुपये किलो अशा दराने सध्या विक्री होत आहे. बॅंकांमध्ये नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. तसेच स्वतःचाच पैसा बॅंकेतून तसेच एटीएममधून काढण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक बाजारात फिरकणे कमी झाले आहे. शिवाय बॅंकेतून दोन ते चार हजार रुपयेच मिळत असल्याने ग्राहक फक्त खूप गरजेच्या वस्तूंवरच खर्च करत आहे. बॅंकेतून मिळालेले पैसे खूप जपून खर्च करण्याकडे कल वाढला आहे. यंदा हिवाळ्याचे पौष्टिक पदार्थ बनविणे कमी पैशामुळे गृहिणींना शक्‍य होत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: customers don't purchase dry fruit in cold period