पावसामुळे फळबागाचे नुकसान 

 Damage to orchards due to rain
Damage to orchards due to rain

सोनगीर (धुळे) - रात्रंदिवस मेहनत करून लेकरांप्रमाणे एकेक झाड जपले, केळी विकल्यानंतरही कर्ज फिटणार तर नाही मात्र कमी नक्की होईल अशी अपेक्षा होती. मात्र पाऊण तासाच्या वादळात व पावसात सर्व अपेक्षा वाहून गेल्या. बुरझड ता.धुळे येथील शेतकरी धनराज ज्ञानदेव पाटील हे सांगत होते. या परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास 40 मिनिटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कांदा व फळबागांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीज पुरवठाही खंडीत झाला.

सोनगीर व परिसरातील सरवड, दापुरा, दापुरी, वाघाडी (खुर्द व बुद्रुक), सोंडले, सार्वे, बाभळे, वायपूर परिसरात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा, भाजीपाला व फळबागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे काहींच्या घराचे भिंत कोसळली व काहींचे छतावरील पत्रे उडाले.

धनराज पाटील यांनी कर्ज काढून तीन एकर शेतीत तीन हजार केळीची झाडे लावलेली जमीनदोस्त झाली. झाडांना लगडलेली केळीचे घड तुटून मातीमोल झाले. पाटील यांचे सुमारे दोन  लाखाचे नुकसान झाले. बँकेचे तसेच पतसंस्थेचे कर्ज काढून अनेक महिने खते, कीटकनाशके, महागडे बियाणे, झाडांना पाणी व त्यासाठी लागलेला विद्यूत खर्च व जिवापाड केलेली मेहनत ऐन फळांची पुर्ण वाढ झाल्यावर वाया गेली आहे.

कधी अवर्षण, कधी अवकाळी अशा लहरी पावसामुळे शेती करणे अवघड झाले आहे. आता कर्ज कसे फेडायचे? याचीच चिंता असल्याचे पाटील सांगत होते. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा नुकसानीची त्वरीत पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

कालच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. केळीची बागेची परिश्रम पूर्वक जपणूक केली. परिश्रम वाया गेल्याचे वाईट वाटत नाही. पण आता कर्ज कसे फेडावे याचीच चिंता आहे. असे मत धनराज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com