दोनशे मुलींनी घेतला 'दंगल' चित्रपटाचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

जळगाव - मुलींच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर आधारित असलेला प्रेरणादायी "दंगल' चित्रपट कन्याशाळेतील मुलींना दाखविण्याचा उपक्रम "जेसीआय'तर्फे राबविण्यात आला. मुलींनी या चित्रपटातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले होते.

ए. जी. शेख, पी. एन. बडगुजर, "जेसीआय'चे अध्यक्ष रफिक शेख यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. कन्याशाळेतील 192 विद्यार्थिनींना आयनॉक्‍स चित्रपटगृहात "दंगल' चित्रपट दाखवण्यात आला. "सकाळ' माध्यम समूहाच्या "यिन' व्यासपीठाचे महसूलमंत्री जिनल जैन, प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर जरीयान सय्यद, आसिफ पठाण, डॉ.संगीता महाजन, वरूण जैन, अल्ताफ, अनिल नागला, अलका पाटील, आबासाहेब पाटील, प्रतीक शेठ, अनुराग गांगुली, जय्यान सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.