मृत्यूचा दाखला नातलगांना घरपोच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पिंपळगाव बसवंत - कुटुंबातील एखाद्या सदस्याचा अनपेक्षितपणे श्‍वास थांबला म्हणजे त्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळतो. या घटनेतून सावरण्यासाठी शोकाकुल परिवाराला मोठा कालावधी लागतो. यानंतर मृताच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू होते. यामुळे मृताच्या वारसांना मिळणाऱ्या सुविधा मिळण्यास दिरंगाई होते. हे ओळखून पिंपळगाव ग्रामपंचायतीने मृत्यूचा दाखला नातलगांना घरपोच देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे नातलगांना ग्रामपंचायतीत मारावे लागणारे हेलपाटे टळणार आहेत.
Web Title: death certificate home delivery

टॅग्स