यशवंतनगरला वृद्ध बिबट्याचा मृत्यू

Death of elderly leopard in Yashwantnagar
Death of elderly leopard in Yashwantnagar

अंबासन/ब्राह्मणगाव  : यशवंतनगर (ता.बागलाण) येथील वनक्षेत्रात एक वृध्द बिबट्या मृतावस्तेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.  ब्राम्हणगाव परिमंडळातील यशवंतनगर येथील डोंगरालगत परिसरातील काही मुले सकाळी बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. डोंगरकडेला झाडीत मृत प्राण्यांची दुर्गंधी येत असल्याने मुलांनी झाडीत शोधले. तेथे मृत बिबट्या त्यांना आढळला. त्यांनी त्वरीत सरपंच सुभाष बागुल व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर पवार यांना माहिती दिली.

पवार यांनी त्वरीत सटाणा वनपरिक्षेत अधिकारी आर.एस.साठे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. असता वनपरिक्षेत्र आधिकारी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.एस.केसकर घटणास्थळी दाखल झाले व बिबट्यास झाडीतुन बाहेर काढले. सदर बिबट्या दहा पंधरा दिवसांपूर्वीच मृत असल्याचे निदर्शनास आले. मृत बिबट्याचा घटणास्थळी पंचनामा करून सटाणा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. सदर बिबट्या पूर्ण वयस्क होऊन वृद्ध झाल्याने मेला असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याच्या यशवंतनगर येथील ग्रामस्थ व पंचासमक्ष पंचनामा करून बिबट्याचे शव सटाणा येथे नेऊन अंतिम संस्कार करण्यात आला. 

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस.साठे. वनपरिमंडळ अधिकारी डी.एस.केसकर. वनसंरक्षक वनमजुर हे उपस्थित होते. ब्राम्हणगाव वनपरिमंडळातील अजमीर, सौंदाणे, देवळाणे, लखमापुर, यशवंतनगरच्या वनक्षेत्रात भरपूर वनसंपदा असल्याने मोर, माकड, लांडगे तसेच चार ते पाच बिबटे असुन परिसरातील नागरिकांना नेहमी निदर्शनास येताय. परंतु येथे महिला वनसंरक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने सतत गैरहजर असतात म्हणुन येथे नव्याने वनसंरक्षक नेमण्याची मागणी वाढली आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com