नववीतल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

लखमापूर - लखमापुर गावाजवळील कादवा नदीपात्रात बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलेला इयत्ता नववी तील विध्यार्थी समीर सोनवणे सोमवारी नदीत बुडाला. दरम्यान, गेले दोन दिवस त्याला शोधण्यासाठी घटना स्थळापासून ते थेट पालखेड धरणा पर्यंत ग्रामस्थांनी शोध घेण्याचे काम सुरूच होते. आज नाशिक हुन अग्निशामक दलाच्या आपत्कालीन टीमने स्थानिकांच्या मदतीने बोटीद्वारे शोधकार्यास सुरुवात केली असता घटना स्थळापासून अवघ्या 100 ते 150 फूट अंतरावरच नदीच्या पाण्याखालच्या कपारीत समीरचा मृतदेह आढळून आला. समीरला शोधण्यासाठी काल करंजवण धरणातून सोडलेले पाणी निम्याने कमी करण्यात आल्याने त्याचा मृतदेह सापडण्यास मदत झाली.

एकुलत्या एक असलेल्या समीरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढताच समीरच्या नातेबाईकांनी हंबरडा फोडला. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, करंजवन धरणाचे शाखा अभियंता महाजन, सर्कल मोंढे, तलाठी नंदकुमार गोसावी, सरपंच मंगल सोनवणे माजी सरपंचा सुभद्रा देशमुख उपस्थित होते. 

यावेळी आपत्कालीन विभागाचे अनिल पोरजे, देविदास इंगळे, तानाजी भास्कर, ज्ञानेश्वर दराडे, मंगेश पिंपळे आदींनि शोधकार्यासाठी परिश्रम घेतले

Web Title: death of student in water