अन्न-पाण्याच्या शोधात पाडस शहरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव - तीव्र उन्हाळ्यात मानवी जीवन प्रभावित झालेले असताना वन्यजीवांच्याही अन्न-पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याच्या शोधात वन्यप्राणी शहराकडे वळू लागले आहेत. गेल्या महिन्यात कुसुंब्यानजीक हरणाचे पाडस आढळून आल्यानंतर असाच प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. आठ महिने वयाचे हरणाचे पाडस थेट आकाशवाणी चौकापर्यंत पोचले. दरम्यान, काही तरुणांनी त्यास उचलून नेत वनविभागाच्या सुपूर्द केले.

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एका हरणाच्या पाडसामागे दोन दारूडे लागले होते. त्यावेळी मुस्लिम कॉलनीतील तरुण आबिद खान जाफर खान, फैयाज बागवान, अबरार खाटीक, मुन्ना शेख, अल्ताफ बागवान या तरुणांनी पाठलाग करून पळत सुटलेल्या पाडसाला पकडून दोघा दारूड्यांना पिटाळून लावले. नंतर त्यास जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी वनविभागाला कळवून हे पाडस वनविभागाच्या स्वाधीन केले.

पाणवठ्यांचा अभाव
उन्हाळ्यात वनक्षेत्रातील पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यामुळे वनविभागातर्फे वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करणे अपेक्षित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणवठे तयार होत नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधार्थ भटकंती सुरू होते. शहराला लागून आणि तालुक्‍यात जळगाव- औरंगाबाद रोडवरील गाडेगाव घाट, सुनसगाव, कंडारी परिसर, लांडोरखोरे, कोल्हेहिल्स्‌चा दऱ्याखोऱ्यांचा भाग, हनुमान खोरे, विद्यापीठालगतचा परिसर, धानवड तांडा आदी परिसरात काळवीट, हरिण, नीलगाय, मोर, ससे, लांडगे अशा वन्यजीवांचा अधिवास आहे. उन्हाळ्यात या परिसरामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊन या वन्यप्राण्यांचे कळप पाण्याच्या शोधात बाहेर पडतात.  

मार्च महिन्यात विमानतळ परिसरात बिबट्याचे पिलू मारले गेल्याची घटना घडली होती. गाडेगाव, कंडारी, उमाळा परिसरात हरणांसह बिबट्यांचाही अधिवास आहे. शहरात हरणांचे कळप पाण्याच्या शोधात येऊ लागले असतील, तर त्यांच्या मागोमाग शिकारीच्या पाळतीवर असलेले बिबटेही शहरात शिरण्याची शक्‍यता आहे.
- वासुदेव वाढे  सदस्य, वन्यजीव संस्था

Web Title: deer in city for food and water