आदिवासी भागातील शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबवावी, मनसेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

खामखेडा (नाशिक) : कळवण तालुकाभरातील कृषी सेवा केंद्रांच्या वतीने खरीप हंगामात बियाणे विक्रेते मनमानी पद्धतीने बियाणे विक्री करत असतात.

खामखेडा (नाशिक) : कळवण तालुकाभरातील कृषी सेवा केंद्रांच्या वतीने खरीप हंगामात बियाणे विक्रेते मनमानी पद्धतीने बियाणे विक्री करत असतात. तालुक्यातील प्रत्येक गावातील कृषी सेवा केंद्रांमध्ये एकाच बियाण्यांच्या वेगवेगळ्या किमती असल्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असल्याने कृषी विभागाने मका तसेच इतर सर्व बियाण्यांच्या विक्री प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेत तालुक्याभरात सर्वत्र एकच किमत ठरवून मका व इतर बियाणे विक्रीची परवानगी द्यावी अन्यथा तालुक्यात बियाणे विक्रीस विरोध करण्यात येईल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने कळवण तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कळवण तालुक्यात कृषी विभागाने खरिपासाठी तीन लाख हेक्टर हून अधिक सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात येत. ह्या क्षेत्रासाठी दरवर्षी 50 हजार हून अधिक क्विंटल बियाण्यांची मागणी तालुक्यातून असते. एकट्या कळवण तालुक्यात पंचवीस हजारहून अधिक क्विंटल मका बियाणे तालुक्यासाठी लागत असते. मात्र  कृषी सेवा केंद्रातून एकाच मका बियाण्याचे वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळे दर असून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना यामुळे लुबाडले जात आहे.

तालुका कृषी विभागाने रासायनिक खते व बी बियाणे विक्रेत्यांची एकत्रित बैठक बोलवत तालुक्यातील सर्वच दुकानांमध्ये खतांच्या व बियाण्यांच्या किमतीत एकसुत्रीपणा आणत तालुका भरात सर्वत्र एकाच किमतीत बियाणे विक्री करण्यासाठीच्या सूचना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू हंगामात बियाणे व खते विक्री करू देणार नाही असा इशारा कळवण तालुका कृषी अधिकारी सुभाष शहां यांना निवेदना द्वारे केली आहे.

नियम धाब्यावर ठेवून कंपन्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लुट करत आहेत.ह्यास आळा बसवण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा  मनसे तालुका अध्यक्ष शशिदादा पाटील,उपाध्यक्ष गौतम जाधव,डाँ.दिपक शेवाळे,चेतन मैंद,चेतन पगार,क्रूष्णा जगताप,सुनिल जाधव,रोशन जाधव,अक्षय परदेशी,सुरज पगार,विनय कोठावदे,पराग मालपुरे,दिपक दुसाने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते
 

Web Title: demand of mns to stop tribal area farmers finance loot