देशात 60 टक्‍क्‍यांपर्यंत ट्रकची चाके थांबली 

Truck
Truck

नाशिक : मालाची वाहतूक करण्यासाठी दिवसाला एक ट्रक तीनशे किलोमीटर अंतर कापतो. त्यासाठी किमान पंधरा हजारांची आवश्‍यकता असते. वाहतूकदारांकडून मिळणाऱ्या पैशांवर ट्रक अद्याप धावताहेत. पण तरीही देशातील विविध भागांमध्ये चलनाच्या तुटवड्यामुळे 30 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत ट्रकची चाके थांबली आहेत.

ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे राष्ट्रीय सल्लागार मलकितसिंग बल यांनी रोज वाहतूक व्यवसायाला साडेचार हजार कोटींचा फटका बसत असल्याचा दावा केला आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर वाहतूक व्यवसायाची स्थिती नेमकी काय आहे, यासंबंधाने बल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. 'सकाळ'शी बोलताना बल म्हणाले, की मालवाहतुकीसाठी रोज 80 टक्के व्यवहार रोखीत करावा लागतो. तीनशे किलोमीटरच्या प्रवासासाठी 6 हजारांचे डिझेल लागते. टोलची माफी असली, तरीही किलोमीटरला नऊ रुपये खर्च करावे लागतात. चालक - वाहकांचे भोजन इतर खर्च समाविष्ट असतो. मालाची भरणी - उतरणी, ट्रकची देखभाल - दुरुस्ती याचीही यात समावेश होता. चालकाकडून नियमांचे उल्लंघन झाल्यावर द्याव्या लागणाऱ्या रकमेचा हिशेब आणखी वेगळा आहे. पण चालू खात्यातून पन्नास हजार रुपये काढण्याची परवानगी असल्याने तेवढ्यात खर्च कसा भागवायचा, हा प्रश्‍न आहे. एका ट्रकवर किमान पाच जण अवलंबून असतात आणि देशात 93 लाख ट्रक मालवाहतूक करतात. त्यावरून व्यवसायाच्या होणाऱ्या नुकसानीची स्थिती स्पष्ट होते. 

वाहतूक समस्येचे पडसाद 
0 कच्च्या मालाची वाहतूक होत नसल्याने काही कंपन्यांनी उत्पादनाकडील हात घेतलाय आखडता 
0 व्यापार-उद्योगावर 40 टक्‍क्‍यांपर्यंत परिणाम झाल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे 
0 कंपन्यांमध्ये कामानिमित्त होणाऱ्या पुढील शट-डाऊन काही व्यवस्थापनांनी आताच केलीय सुरू 
0 फळ व्यापाऱ्यांना वेळेत ट्रक उपलब्ध व्हावेत म्हणून वेळप्रसंगी 10 टक्के अधिकचे द्यावे लागते भाडे 
0 वाहतूकदारांनी कार्ड स्वाइपसाठी बॅंकांनी यंत्र नेण्यास केलीय सुरवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com