पाणीप्रश्न सोडवण्याचा 'तनिष्कां'चा निर्धार 

दीपक कच्छवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) - दहिवद येथे आज सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का गटाची स्थापना करण्यात आली. यानिमीत्ताने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात खेळिमेळीच्या वातावरणात बैठक झाली. बैठकीत स्त्री प्रतिष्ठेचा जागर करून 'सकाळ'च्या माध्यमातुन कळमडु व राजमानेचा पाणीप्रश्न सोडवण्याचा 'तनिष्कां'नी निर्धार केला.

दहीवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दुपारी एकला 'तनिष्का' गटाच्या सदस्यांची बैठक झाली. गटप्रमुख ज्योती चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश पाटील, डॉ. किशोर जाधव उपस्थित होते. बैठकीत 'तनिष्का' व्यवस्थापक आमोल भट यांनी माहीती दिली. तसेच विविध प्रश्नावर तनिष्कांनी चर्चा केली. यावेळी आरोग्यासह गावात विकास कसा साधता येईल यावर उपस्थित 'तनिष्कां'नी आपली मते मांडली. 

बैठकीला छाया झोडगे, रेखा सोनार,सुवर्णा सोमवंशी, रेखा चौधरी, वर्षा पवार, सुनंदा मोरे, संगीता माळी, नम्रता गढरी,सुरेखा सौदांणे, संगीता सोनवणे, सविता पाटील, मंगला पाटील, रंजना केदार, विमल सावंत, दिपाली पवार, नंदाबाई पवार, संजीवनी वाघ, सुनंदा पाटील, विठाबाई पाटील, कविता पाटील,ज्योती सोनवणे, सरला मोरे,मनिषा पाटील, रंजना मोरे, अंजना निकम, आदी उपस्थित होत्या. उपस्थित 'तनिषकां'नी आगामी होणार्‍या विविध कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चा केली. गावाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन गटप्रमुख ज्योती चव्हाण यांनी केले. 

'सकाळ'ने राजमाने गावातील पिण्याच्या पाण्याचे समस्येचे वास्तव चित्र मांडले होते. त्याची दखल घेत राजमानेत हातपंप कार्यान्वित केला. या बातमीच्या अनुशंगाने कळमडु व राजमाने गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी 'तनिष्का'नी पुढाकार घेतला आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणेकडे 'तनिष्का' पाठपुरावा करतील 

Web Title: The determination of 'Tanisha' to solve the water problem