भामेर ग्रुप ग्रामपंचायतीवर 'ग्रामविकास'चा झेंडा

भामेर ग्रुप ग्रामपंचायतीवर 'ग्रामविकास'चा झेंडा
भामेर ग्रुप ग्रामपंचायतीवर 'ग्रामविकास'चा झेंडा

सरपंचपदी वैशाली सोनवणे विक्रमी मताधिक्याने विजयी

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) ग्रुप ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी ग्रामविकास पॅनलच्या वैशाली मनोज सोनवणे 1865 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी परिवर्तन पॅनलच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेखा सुभाष सोनवणे यांचा 896 मतांनी पराभव केला. पराभूत उमेदवार सुरेखा सोनवणे यांना 969 मते मिळाली. निकाल जाहीर होताच समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विजयी उमेदवारांची गावातून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

ग्रामविकास पॅनलचे 10, परिवर्तन पॅनलचे 2, तर 1 अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. यापूर्वी ग्रामविकास पॅनलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यात रत्नाबाई वाघ, तुळशीराम कोरडकर, जबनाबाई भिल व सिंधुबाई सोनवणे यांचा समावेश आहे. उर्वरित नऊ जागांसाठी मतदान झाले. त्यात नऊ पैकी सहा जागांवर ग्रामविकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले. त्यात भीमराव बर्डे, लक्ष्मीबाई जाधव, सुभाष भिल, मनीषा सोनवणे, शिवा कारंडे, निलाबाई थोरात यांचा समावेश आहे. तर अपक्ष उमेदवार सरलाबाई अरुण सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून अवघ्या दोन मतांनी निसटता विजय मिळवला. प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलचे केवळ दोनच उमेदवार विजयी झाले. त्यात पांडुरंग सोनवणे व नाना थोरात यांचा समावेश आहे. त्यांनी 'ग्रामविकास'चे उमेदवार अनुक्रमे विजय वाघ व विठ्ठल बोरसे यांचा पराभव केला. पराभूत उमेदवारांमध्ये रंजनाबाई वाघ, गौतम थोरात, सुरेखा गवळे, बापू भिल, अश्विनी गवळे, मीराबाई निकुंभ, मोतीराम कारंडे, भटाबाई कारंडे आदींचा समावेश आहे.

भामेर ग्रुप ग्रामपंचायतीत भामेरसह रायपूर, शिवाजीनगर, नवागाव, जगतपूर, जयभीम सोसायटी व जयश्री सोसायटी या गावांचा समावेश आहे. भामेरला तीन बुथ तर शिवाजीनगर व रायपूरला प्रत्येकी एक बूथ होता. परिक्षेत्र अधिकारी म्हणून पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी जे. पी. खाडे यांनी काम पाहिले. निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला.
ग्रामविकास पॅनलतर्फे पॅनलप्रमुख जीभाऊ वाघ, माजी सरपंच मनोज सोनवणे, डॉ. भरत वाघ, चिंतामण मारनर, गोकुळ थोरात, नाना बोरकर, सोमा ठेलारी, मनीलाल सोनवणे, देविदास सोनवणे, प्रकाश सोनवणे, वसंत वाघ, गोकुळ जाधव, मालजी सोनवणे, वसंत सोनवणे, राजेंद्र जाधव, पांडुरंग शामभाऊ सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. तर विरोधी परिवर्तन पॅनेलतर्फे पॅनलप्रमुख सुभाष सोनवणे यांनीही सहकाऱ्यांसह जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

"आगामी काळात भामेर ग्रुप ग्रामपंचायतीमधील सर्व गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू. ग्रामविकास पॅनलप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व मतदारांनी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."
- सौ. वैशाली मनोज सोनवणे, नवनिर्वाचित सरपंच भामेर ग्रुप ग्रामपंचायत, ता.साक्री..

"थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत भामेर ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले. परंतु ग्रुपमधील काही गावांनी पाहिजे तेवढे सहकार्य केले नाही. हा धनशक्तीचा विजय आहे."
- सुभाष सोनवणे, परिवर्तन पॅनलप्रमुख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com