धुळे: दोन मोठ्या नेत्यांच्या समर्थकात रंगला कलगीतुरा

जगन्नाथ पाटील
शनिवार, 15 जुलै 2017

....तुला भरोसा नाय का ?
पाणी पुरवठा योजने बरोबरच विविध विकासकामे आणि धीरज बडगुजर मृत्यू प्रकरणीही सोशल मीडीयावर रंगू लागले आहे. टिकाटिप्पणीमध्ये गंभीरता आहेच. पण शब्दशेलक्याही मोठ्या मार्मिकपणे वापरल्या जात आहेत.

कापडणे (जि.धुळे) : पुरोगामी विचारसणीच्या कापडणेत राजकिय समीकरणे व टिकाटिप्पणीच्या बाबी वैयक्तिक स्तरावर घसरत चालल्या आहेत. सध्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायतीचे गटनेते भगवान पाटील तसेच भाजप कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परीषदेचे माजी सदस्य बापू खलाणे यांच्या समर्थकांमध्ये सोशल मिडियावर जोरदार टिकाटिप्पणी सुरु आहे. त्यासाठी तारखा, फोटो, कागदपत्रे यांचे पुरावेही दिले जात आहेत. समर्थकांमधील शब्दशेलक्या चांगल्याच गाजत आहेत. खास करुन.....तुला भरोसा नाय का असे मोठ्या खूबीने मांडले जात आहे.

सोनवद प्रकल्प पाणी योजनाच केंद्रस्थानी
तीन कोटी चौदा लाखाची पाणी पुरवठा योजना राजकारणासाठी मसाला पुरविणारी बाब झाली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायतीचे गटनेते भगवान पाटील तसेच भाजपा कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परीषदेचे माजी सदस्य बापू खलाणे यांचे समर्थक एकमेकांवर आगपाखड करीत आहेत. जिव्हारी लागेल असे शब्दप्रयोगही करीत आहेत. दोन्ही नेत्यांचे मात्र एकमेकांविषयी मौनच आहे. या योजनेवर ग्रामपंचायतीच्या दोन पंचवार्षिक निवडणूका पुर्ण झाल्या आहेत. ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळणार नसल्यानेही संताप व्यक्त होतच आहे.
     
....तुला भरोसा नाय का ?
पाणी पुरवठा योजने बरोबरच विविध विकासकामे आणि धीरज बडगुजर मृत्यू प्रकरणीही सोशल मीडीयावर रंगू लागले आहे. टिकाटिप्पणीमध्ये गंभीरता आहेच. पण शब्दशेलक्याही मोठ्या मार्मिकपणे वापरल्या जात आहेत. सध्या सोनू तुला भरोसा नाय का हे गीत व्हाॅटस अॅपवर गाजत आहे. त्यावर आधारीत दोन्ही विरोधकांचे समर्थक बापू तुला भरोसा नाय का तसेच भाऊ तुझा मोठाभाऊंवर भरोसा नाही का असे विडंबन वापरले जात आहे.

दोघा नेत्यांनी समर्थकांना घालावे वेसन...
पाटील आणि खलाणे या नेत्यांनी समर्थकांची समजूत घालावी.  व्हाॅटस अॅप व फेसबुकवरील टिकाटीप्पणी खालच्या स्तरावर घसरत चालली आहे. याचे पडसाद तीव्र होत चालले आहेत. सायबर क्राईमसारखे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा वेळेवरच वेसन घालणे चांगले ; अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :