ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटावे- रतनचंद शहा

एल. बी. चौधरी 
रविवार, 6 ऑगस्ट 2017

राज्यव्यापी मेळावा 19 व 20 आॅगस्टला    

सोनगीर (जिल्हा धुळे) : ग्राहकांना काल आणि आजही अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे. राज्यभरातील ग्राहक संघटीत नाही. उत्पादन व मुल्य ठरविण्यात ग्राहकांच्या मताला किंमत दिली जात नाही. ग्राहकांचे हक्क डावलले जातात. त्यामुळे ग्राहक पंचायतीचे कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असून अन्याय झालेल्या ग्राहकांना ग्राहक पंचायत मार्फत न्याय मिळवून देण्यासाठी झटावे. असे आवाहन ग्राहक पंचायतीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रतनचंद शहा यांनी केले. 

 येथील आनंदवन संस्थान सभागृहात येत्या 19  व 20 आॅगस्टला राज्य ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. नियोजनासाठी आज श्रीकॄपा वाणी मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा ग्राहक पंचायतीचे कार्यकारी अध्यक्ष रतनचंद शहा होते. त्यावेळी ते बोलत होते. 

ग्राहक पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. विजय लाड यांनी सर्व कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत राज्यव्यापी अधिवेशन यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन केले. 
नाशिक विभागीय संघटक डाॅ योगेश सुर्यवंशी,  जिल्हासंघटक रविद्र महाजनी, जिल्हा सहसचिव डाॅ.  अजय सोनवणे, शिरपुरचे तालुका संघटक प्रा.  राकेश मोरे, शिंदखेड्याचे तालुका संघटक प्रा.  चंद्रकांत डागा, धुळे तालुका संघटक एम. टी. गुजर, सोनगीरचे अध्यक्ष डाॅ. कल्पक देशमुख, सचिव शेखर देशमुख आदींनी विचार मांडले.
धुळे शहर संघटक एस पी नेतकर, एम टी गुजर, किशोर पावनकर, प्रा. डागा यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

सुक्ष्म नियोजनावर भर देण्याचे सर्वानुमते ठरले. एकुण 10 सत्रात अधिवेशन चालेल. डाॅ लाड व कोअर कमीटीने घेतलेल्या कार्यक्रमाच्या रुपरेषे प्रमाणे कार्य करण्याचे ठरले. 
श्री. शहा म्हणाले की, ग्राहक म्हणून फसवणुक झाल्यास ग्राहक मंचात तक्रार करावी. तसेच एखाद्या पतसंस्थेने ग्राहकांचे पैसे बुडविल्यास तीन महिन्यांत तक्रार करता येते व संचालकांच्या मालमत्ता आपल्या नावावर करता येते. नियोजीत राज्यव्यापी अभ्यासवर्गातून भरपूर शिकायला मिळेल. तो यशस्वीपणे पार पाडून  ग्राहक जागॄती, प्रबोधनाचे कार्य करणे हीच बिंदुमाधव जोशींना खरी श्रद्धांजली ठरेल. 
प्रस्तावना जिल्हासंघटक रविंद्र महाजनी यांनी केली.  जिल्हासहसचिव डाॅ अजय सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी  एकमेकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी जिल्हासचिव एस. एम. पाटील, शरद पाचपुते, शिवनाथ कासार, नंदु कोठावदे, शरद चौक, रोशन जैन, विशाल कासार, राहुल देशमुख, दिपक रमेश पाटील, कल्पेश पाटील, डाॅ नयन सुर्यवंशी, राजू पाडवी, एल बी चौधरी, सुरेश देशमूख, शांतीलाल पटेल, विलास हुकुमचंद गुजर, आत्माराम निळकंठ सुर्यवंशी, सतिष निकुंभे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.