किरकोळ कारणावरून  मारहाण, पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

धुळे -शहरातील मिल परिसरातील श्रीरामनगरात पाच जणांनी मागील भांडणाचा वाद उपस्थित करून पाच जणांना मारहाण केली. त्यात पाचही जण जखमी झाले असून त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीरामनगरात राहणारा अजय उत्तम माळी (वय२२) हा बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घराबाहेर उभा होता. त्यावेळी संदीप रवींद्र पाटील, प्रमोद अभिमन पाटील, शुभम रवींद्र पाटील, रवींद्र पाटील व ज्ञानेश्‍वर अभिमन पाटील सर्व रा. श्रीराम नगर यांनी हातात चाकू, गुप्ती, लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी मागील किरकोळ भांडणाचा वाद उपस्थित करून जातिवाचक शिवीगाळ केली. हातातील हत्यारांनी अजय माळी याला कमरेला मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यांच्यासह रवींद्र उत्तम माळी (वय १८), अनुमित विठ्ठल सोनवणे वय २२, योगेश विलास भिसे वय २२, रवींद्र काशिनाथ जिरे वय २४ सर्व रा. श्रीराम नगर यांना शिवीगाळ करून हाताबुक्‍यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. अजय माळी याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स