धुळ्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): चालू शैक्षणिक वर्षापासून अकरावी तर पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या इंग्रजीसह अन्य भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा बदलणार असून, नाशिक विभागीय मंडळातर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे दोन दिवसीय तर एसएसव्हीपीएस महाविद्यालयात मराठी व हिंदी विषयाचे एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

प्रा. राजेंद्र अग्रवाल (साक्री), प्रा. विजय पाटील (धरणगाव), प्रा. जोगेश शेलार (चोपडा), प्रा. हाडपे (चोपडा), प्रा. अविनाश पाटील (अमळनेर), प्रा. नेरकर (लोणखेडा) आदी इंग्रजीचे विषयतज्ञ होते. शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, विभागीय सहसचिव वाय. पी. निकम आदींनी प्रशिक्षणस्थळी भेट दिली. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील, प्राचार्य डॉ. सूर्यवंशी, संचालक प्रा. एम.एल. पाटील, समन्वयक प्रा. व्यास आदींनी विशेष सहकार्य केले. प्रशिक्षणास धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील विषय शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.