शेतकरी कर्जमाफीचे आतापर्यंत ऑनलाईन पन्नास हजारांवर अर्ज

शेतकरी कर्जमाफीचे आतापर्यंत ऑनलाईन पन्नास हजारांवर अर्ज

धुळे - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जून 2016 ला थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीसाठी तसेच 2016 मध्ये घेतलेल्या कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी जिल्हा बॅकेच्या शाखा, सहाय्यक निबंधक कार्यालय , इतर राष्ट्रीयकृत बॅका, तसेच तहसील कार्यालयातून आतापर्यंत 60 हजारांवर अर्जांचे वाटप केले आहे. पैकी कालच्या प्राप्त माहितीनुसार पन्नास हजारांवर शेतकर्यांनीच ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत बॅकेकडे सादर केली आहे. थम्ब केल्यानंतर तो अर्ज ऑनलाईन रजिष्ट्रेशन होऊन,अॅपलिकेटेड होतो.अद्याप ही बहुतांश शेतकर्यांचे तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्याचे कामास गती मिळत नाही. याचा जिल्हास्तरावरून मागोवा घेण्याचे काम दर दिवसाला घेणे सुरू आहे. साक्री, शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुक्यातून 'महाऑनलाईन' सेवा, 'ई सरकार' ची रजिष्टर  झालेली माहिती जिल्हा सेतू केंद्र घेत आहे. ऑनलाईन अर्जाबाबत सर्व्हर ची समस्या होती. त्यात पन्नास टक्के काम झाले आहे. कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शेतकर्यांनी एक जूनपासून संप पुकारला होता. त्याची दखल घेत राज्य शासनाने कर्जमाफीसाठी 27 जून ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. 2016 ला थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे.

त्यानंतरच्या नियमित कर्जदारांना 25 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांसाठी पात्र असलेल्या शेतकर्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यासाठी पात्र असलेल्या शेतकर्यांना प्रत्येकी एक अर्ज देण्यात आला आहे. हे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांना महा- ई- सेवा केंद्र, ई संग्रामचे केंद्र, सीएसई, केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. या केंद्रावरील वीज नसणे, आदि कारणांमुळे शेतकर्यांना हे अर्ज भरण्यासाठी तासनतास उभे राहावे लागते. यामुळे शेतकर्यांनी अर्ज ताब्यात घेतले असले तरी माहिती ऑनलाईन भरण्यासाठी शेतकर्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आतापर्यंत आकडेवारी टप्याटप्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानुसार पात्र शिक्षकांची संख्या, अर्ज वितरीत झालेली संख्या, यांचा सांख्यिकी ताळमेळ गणित बसविणे आवश्यक आहे. यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

गावस्तरावर बहुतांश शेतकरी कुटुंब या विविध जाचक अटी व निकषामुळे लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे लाभार्थी संख्या कमी झाली आहे.

या आदेशाबाबत कुठलीही माहिती जिल्हा स्तरावर अद्याप मिळालेली नाही. मात्र अंतर्गत गोपनीयता याबाबत पाळली जात असल्याचे समजते.ऑनलाईन शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र त्यात आणखी भर पडत सोळा अटी, निकष असल्याच्या हालचाली सुरू आहेत. अद्याप त्याला अधिकृत दुजोरा कुणीही  दिला नसला तरी, त्याची वाच्यता होऊ नये म्हणून, ती गोपनियता पाळली जात आहे. खरे लाभार्थी शेतकरी किती याची माहिती या माध्यमाने समोर येणार आहे.प्राप्त माहितीनुसार मुद्दे असे- जमीन खरेदीसाठी घेतलेले कर्ज,  वेअर हाऊस, शीतगृह, माती परिक्षण, रोपवाटिका, बीज प्रकिया, अन्नप्रक्रिया, आदींसाठी घेतलेले कर्ज, कृषी, चिकित्सा आणि केंद्र कृषी कर्ज पुरवठा करणार्या पतसंस्था, सावकाराचे कर्ज, गृहकर्ज, करार शेती, मोटरकार, दुचाकी सर्व मुद्द्यांचा समावेश आहे. मात्र सध्या हा विषय कुठेही पटलावर नाही. हळूहळू खरी स्थिती लवकरच समोर येईल. एवढे मात्र नक्की..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com