शेतकरी संपाला धुळ्यात पाठिंबा, मध्य प्रदेशचा भाजीपाला रोखला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

धुळे : शेतकरी संपाला गुरुवारी धुळे तालुक्‍यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाठिंबा दिला गेला. कापडणे (ता. धुळे) येथे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने सकाळी साडेसातपासून आंदोलन सुरू केले. यात सरासरी एक हजार लिटर दूध ओतले. अर्थात प्रातिनिधिक स्वरूपात काहीसे दूध ओतल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना परत दिले गेले. नंतर संघटनेने देवभाने (ता. धुळे) शिवारात मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दुतर्फा वाहतूक खोळंबली. या आंदोलनामुळे मध्य प्रदेशकडून वाहनांव्दारे येणारा भाजीपाला रोखला गेला आणि तो परत मध्य प्रदेशकडे पाठविण्यास भाग पाडण्यात आले.

धुळे : शेतकरी संपाला गुरुवारी धुळे तालुक्‍यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाठिंबा दिला गेला. कापडणे (ता. धुळे) येथे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने सकाळी साडेसातपासून आंदोलन सुरू केले. यात सरासरी एक हजार लिटर दूध ओतले. अर्थात प्रातिनिधिक स्वरूपात काहीसे दूध ओतल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना परत दिले गेले. नंतर संघटनेने देवभाने (ता. धुळे) शिवारात मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दुतर्फा वाहतूक खोळंबली. या आंदोलनामुळे मध्य प्रदेशकडून वाहनांव्दारे येणारा भाजीपाला रोखला गेला आणि तो परत मध्य प्रदेशकडे पाठविण्यास भाग पाडण्यात आले. तसेच संघटनेने खासगी क्षेत्रातील वसुंधरा दूध केंद्राच्या कापडणे येथील कार्यालयास कुलूप ठोकले. या केंद्राला पुरवठा होणारे 65 हजार लिटर दूध रोखण्यात आले. शिंदखेडा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत शेतकरी संपाला पाठिंब्याचा ठराव पारित झाला. साक्री येथे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे शेतकरी संपाला पाठिंब्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

दूध तर मिळाले...
वृक्षलागवड योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शेतकरी संपाचा जिल्ह्यात काय परिणाम जाणवतोय, असा प्रश्‍न काही पत्रकारांनी उपस्थित केला. सकाळी माझ्या घरी दूध आल्यामुळे संप असल्याचे जाणवले नाही, संप असता तर दूध मिळाले नसते, असे गंमतीत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले.