धुळे : तीन महिन्यात चौदा शेतकर्‍यांच्या आत्महत्या

जगन्नाथ पाटील
रविवार, 24 सप्टेंबर 2017

सहाच आत्महत्या पात्र...
चौदा शेतकरी आत्महत्यांपैकी सहाच आत्महत्या या शेतकरी आत्महत्या म्हणून पात्र ठरविल्या आहेत. इतरांनी अपात्र ठरवितांना विविध निकष लावलेले जातात. बँकेतून कर्ज घेतलेले शेतकरी पात्र निकषामध्ये बसविले जातात. इतरांना अपात्र ठरवितांना हाच निकष लावले जात असतात. शेतकर्‍यांचे  सावकारी कर्ज  जिल्हा प्रशासनाच्या अथवा राज्य शासनाच्या लक्षात येत नाही. शेतकरी कुटुंबेही तशी तक्रार करीत नाहीत. तेही त्यांच्या उपकाराखाली दबलेले असतात. परीणामी अल्पसा का असेना शासकिय लाभापासून ते कुटुंब वंचित राहतात.

धुळे : ऐन पावसाळ्यात पेरणी केल्यानंतर पाऊस नाही, सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळाची चिन्हे, नापिकी, शेतीमालाला योग्य भावाचा अभाव, शासनाची कर्जमाफीबाबत दुटप्पी भूमिका, खासगी सावकाराची तगतग आदींमुळे चौदा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. पावसाळ्यातील महत्वपूर्ण जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात आत्महत्या झाल्या आहेत. शेतात विष प्राशन करणे, गळफास घेणे व विहिरीत उडी मारणे या पध्दतीने आत्महत्या झाल्या आहेत. राज्यातील सर्वात लहान जिल्ह्यात आत्महत्यांचे हे प्रमाण अतिशय अधिक आणि चिंता लावणारे आहे.

जुलैतील आत्महत्याग्रस्त शेतकरी
शामराव बाबुराव (बाळदे, शिरपूर) , राजेंद्र प्रभाकर पाटील (हतनूर, शिंदखेडा) , उमाजी अंबर पाटील (गोराणे, शिंदखेडा) , प्रवीण राजेंद्र पाटील (कापडणे, धुळे)  व रोहीदास हिलाल पाटील (बुरझड, धुळे )

आॅगस्टमध्ये आठ आत्महत्या 
नरेंद्र भिवसन पाटील (करवंद , शिरपूर) , काशिनाथ जगन्नाथ माळी (मोघण, धुळे), निंबा भटू माळी (म्हसाळे, साक्री), ज्ञानेश्वर अशोक बडगुजर (कापडणे, धुळे), ईश्वर हिरामण पाटील (अजंग, धुळे), भाऊसाहेब दौलत माळी (निमगुळ, धुळे), दोधू चैत्राम पाटील (होळ, शिंदखेडा) व सतिष प्रकाश पाटील (चिंचखेडे, साक्री) सप्टेंबरमध्ये (कुडाशी ता.साक्री) येथील गुलाब रेशमा भोये यांनी आत्महत्या केली आहे. चारही जिल्हे मिळून चौदा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सहाच आत्महत्या पात्र...
चौदा शेतकरी आत्महत्यांपैकी सहाच आत्महत्या या शेतकरी आत्महत्या म्हणून पात्र ठरविल्या आहेत. इतरांनी अपात्र ठरवितांना विविध निकष लावलेले जातात. बँकेतून कर्ज घेतलेले शेतकरी पात्र निकषामध्ये बसविले जातात. इतरांना अपात्र ठरवितांना हाच निकष लावले जात असतात. शेतकर्‍यांचे  सावकारी कर्ज  जिल्हा प्रशासनाच्या अथवा राज्य शासनाच्या लक्षात येत नाही. शेतकरी कुटुंबेही तशी तक्रार करीत नाहीत. तेही त्यांच्या उपकाराखाली दबलेले असतात. परीणामी अल्पसा का असेना शासकिय लाभापासून ते कुटुंब वंचित राहतात.

दरम्यान जिल्ह्यात शेतकर्‍याच्या आत्महत्यांचा  आलेख वाढताच आहे. सलग तिसर्‍या वर्षी पावसाच्या सातत्याचा अभाव, कर्जबाजारीपण व त्यातून निर्माण होणारी कौटुंबिक कलह आदी कारणे आहेत. शेतकर्‍यांसाठी शासनाने स्वतंत्र संकल्प सादर करणे . शेती उत्पादनाला हमी भाव देणे आणि शेतकरी सुकाणू समितीच्या मागण्या मान्य झाल्यास आत्महत्यांचे प्रमाण निश्चितच कमी होईल ; असा आशावाद जाणकार शेतकरी व्यक्त करतात.

तालुका आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी संख्या
धुळे - 07
शिंदखेडा- 02
शिरपूर- 02
साक्री -03

Web Title: Dhule news farmers suicide in Dhule