शिक्षण घेताना दोन मित्रांनी मुर्तीकलेत शोधला स्वयंरोजगार

ganesh statue
ganesh statue

कापडणे (जि.धुळे) : चेतन आणि हरीष पदवीचे शिक्षण घेत आहेत. दोघानाही मूर्ती कलेची आवड आहे. त्यांनी सहा महिन्यांपासून गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती बनविण्याचा निर्धार केला. अन आजपर्यंत एक लाखाच्या मूर्त्या अॅडव्हान्स बुकींक झाल्या आहेत. लाखाच्या मुर्त्यांवर शेवटचा हात मारण्याचे सुरु आहे. केवळ आवडीतून वेळ काढली. शिक्षण सुरुच आहे. पण दोन लाखाच्या मुर्त्या बनविण्याचे साहस त्यांनी केले. यास आर्थिक मदत बँक आॅफ महाराष्र्टने मुद्रा कर्जातून केली आहे. गणेश मुर्ती बघितल्यानंतर कसलेल्या कारागिराने मुर्ती तयार केल्या आहेत. याची पुर्णतः खात्री होते. त्यांनी पदवीनंतर पुर्णवेळ मुर्ती कलेत उतरण्याचा निर्धार केला आहे. 

चेतन चौधरी आणि हरीष माळी हे दोन्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. अजय तर एल.एल. बी. करीत आहे. दोघांची परीस्थिती बेताचीच आहे. दोघे येथील ख्यातनाम मुर्तीकार बंधू गणेश अाणि कैलास कुंभार यांच्याकडे रोजंदारीने मुर्तीकाम करण्यासाठी जात. त्यातूनच त्यांना छंद जळला. अन केवळ सहा महिन्यात त्यांनी एक हजार गणेश मुर्ती तयार केल्या आहेत. यात शेषनागधारी, सिंहासनाधिष्ठीत, वीणाधारीत, डंबरु वाजविरी आदी विविध मुर्ती बनविल्या आहेत. सध्या रंगकामात गुंतले आहेत. विशेष म्हणजे दोघांनी इतर दोघां मित्रांनाही रंगकाम करण्यासाठी रोजगार उपलब्ध करुन दिला  आहे.

शिक्षणानंतर पुर्णवेळ मुर्तीकलेसाठीच...
चेतन एल.एल.बीच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यास मुर्तीकलेत कमालीचे स्वारस्य निर्माण झाले आहे. पदवीनंतर वकीलीत न गुंतता, मुर्तीकलाच विकसित करण्याचा साहसी निर्णय घेतला आहे. त्यास हर्षलही साथ देणार आहे. दोघेही रोजंदारीकरुन शिक्षण घेत आहेत. आता तर स्वयंरोजगार त्यांना परीससम सापडला आहे. दरम्यान पीओपी, रंग, काथ्या आदी मुर्तीकलेसाठी आवश्यक असतात. गेल्या वर्षभरापासून या साहित्याचे भाव वाढलेले नव्हते. मात्र जीएसटी लागू झाल्यापासून भाव वाढल्याचे चेतन व हरीषने सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com