'गोकुळ माळी खून प्रकरणाची सीआयडी चौकशी करा'

गोकुळ रतन माळी
गोकुळ रतन माळी

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे(ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष, माळी महासंघाचे पदाधिकारी व पाटबंधारे विभागाचे वाहनचालक गोकुळ रतन माळी यांच्या खुनाची सखोल सीआयडी चौकशी करावी व खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रमोद महाजन (पुणे) यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिला आहे.

नऊ महिन्यांपूर्वी अर्थात गेल्या 28 जानेवारीला साक्री येथील तहसीलदार कार्यालयासमोर रात्री अकराच्या सुमारास गोकुळ रतन माळी (बोढरे) (वय 57) यांची मोटारीला बांधून व जाळून निर्घृणपणे हत्या झाली होती. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा गुन्हा संशयितांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यांनतर पोलिसांनी पाचही संशयितांना त्वरित अटकही केली होती. पाचही आरोपी सद्या जामिनावर आहेत. परंतु पोलिसांचा तपास अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा आरोप माळी कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा सीआयडी चौकशी करून श्री. माळी यांच्या खुनामागे संपत्तीच्या वादाव्यतिरिक्त अन्यही काही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक कारणे आहेत का? त्यादिशेनेही तपास करावा, अशी मागणीही माळी कुटुंबियांनी केली आहे.

सदर घटनेचा निजामपूर-जैताणेच्या ग्रामस्थांनीही एकदिवसीय कडकडीत बंद पाळून तीव्र निषेध केला होता. जैताणेतील सावता मंदिरापासून निजामपूर पोलीस ठाण्यावर दोन्ही ग्रामपंचायतींसह परिसरातील विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी व तनिष्कांनी मुकमोर्चा काढून तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निवेदनही दिले होते. परंतु, त्यांनतर कोणीही पाठपुरावा केला नसल्याची खंतही माळी कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com