सोनगीरला उद्यापासून ग्राहक पंचायतीचा राज्यव्यापी मेळावा

एल. बी चौधरी
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

सोनगीर (धुळे): सोनगीरला उद्यापासून ग्राहक कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रबोधन अभ्यासवर्ग होत आहे. यातून दोन दिवस (ता. 19 व 20) नावाजलेल्या वक्त्यांचे व्याख्यानाचा आनंद कार्यकर्त्यांना मिळणार आहे. त्यासाठी राज्यातील ग्राहक पंचायतीचे शेकडो कार्यकर्ते हजर राहणार आहेत.

सोनगीर (धुळे): सोनगीरला उद्यापासून ग्राहक कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रबोधन अभ्यासवर्ग होत आहे. यातून दोन दिवस (ता. 19 व 20) नावाजलेल्या वक्त्यांचे व्याख्यानाचा आनंद कार्यकर्त्यांना मिळणार आहे. त्यासाठी राज्यातील ग्राहक पंचायतीचे शेकडो कार्यकर्ते हजर राहणार आहेत.

येथील आनंदवन संस्थानच्या सभागृहात येत्या  19 व 20 ऑगस्टला ग्राहक कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रबोधन अभ्यासवर्ग होत असून, राज्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भात  नियोजन पूर्ण झाले आहे. अभ्यासवर्गाचे उद्घाटन  संरक्षण राज्यमंञी डॉ. सुभाष भामरे यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्य ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. विजय लाड असतील. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटक सर्जेराव जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष मार्तंडराव जोशी, विभागीय संघटक अरुण भार्गवे, सहसंघटक डॉ. योगेश सुर्यवंशी, सरपंच योगिता महाजन, उपसरपंच धनंजय कासार, राज्य सचिव अर्जुन वाघमारे, विनायक पाचपुते, राज्य सहसंघटक मेघाताई कुलकर्णी असतील. भोजन, स्वागत, स्टेज, सुत्रसंचलन, नोंदणी, स्टेशनरी, कोषागार, संपर्क, महीला अशा 10 समिती स्थापन करण्यात आल्या. एकुण 6 सत्रात हे उद्बोधन वर्ग  चालेल. प्रकाश पाठक, अनिल जोशी, पवन अग्रवाल, डॉ. विजय लाड, सुरेश वाघ, प्रा. डॉ. देसले, सर्जेराव जाधव, अजय भोसरेकर आदींचे व्याख्यान आहे.

यावेळी उद्बोधनवर्गासाठी लागणाऱ्या खर्चासंदर्भात आर्थीक नियोजन करण्यात आले असून, काही प्रायोजक पुढे आले आहेत. धुळे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष अॅड. जे. टी. देसले, रतनचंद शहा, रवींद्र महाजनी, डॉ. अजय सोनवणे, धुळे तालुका अध्यक्ष एम. टी. गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्राहक पंचायतीचे  डॉ. कल्पक देशमुख, शेखर देशमुख, एल. बी. चौधरी, आरीफखाँ पठाण, शरद पाचपुते, शिवनाथ कासार, ज्ञानेश्वर चौधरी, नंदकिशोर कोठावदे, के. के. परदेशी, मनोज जैन, प्रसाद जैन, राहुल देशमुख, दीपक पाटील, कल्पेश पाटील, विशाल कासार आदी कार्यकर्ते संयोजन करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :