इंटरनेट सुविधेअभावी जैताणे सेंट्रल बँक शाखेचे व्यवहार ठप्प

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

अपुरा कर्मचारी वर्ग...
जैताणे येथील सेंट्रल बँक शाखेला माळमाथा परिसरातील 27 गावे जोडलेली आहेत. परंतु या शाखेत 6 ते 7 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना येथे केवळ तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. कॅशियरची बदली झाली असून शाखाधिकारी प्रशिक्षणासाठी गेल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडतो. त्यात पुन्हा इंटरनेटच्या असुविधेमुळे सर्वसामान्य शेतकरी व ग्राहक वेठीस धरले जातात व नाहक भरडले जातात. याकडे शासन व बँक प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे अशी सर्वसामान्य ग्राहकांची अपेक्षा आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जैताणे (ता.साक्री) येथील सेंट्रल बँक शाखेचे आर्थिक व्यवहार इंटरनेट सुविधेअभावी शनिवारपासून ठप्प झाले असून माळमाथा परिसरातील सुमारे 27 गावांच्या ग्राहकांची व शेतकऱ्यांची गेल्या पाच-सहा दिवसांपासून मोठी गैरसोय झाली आहे.

शनिवारनंतर आलेली रविवारची सुटी त्यांनतर बँकांचा कालचा (ता.22) एक दिवसीय लाक्षणिक संप आणि आज (ता.23) तर चक्क सेंट्रल बँक शाखेच्या बाहेर "इंटरनेट सुविधेअभावी दोन दिवस बँकेचे व्यवहार बंद राहतील" असा लावलेला बोर्ड यामुळे सर्वसामान्यांची चांगलीच गैरसोय झाली. काय करावे कुणालाच काही सुचत नव्हते.

बँकेचे शाखाधिकारी प्रशिक्षणासाठी गेल्याने आज बँकेत केवळ दोन कर्मचारी व एक शिपाई असे तीनच कर्मचारी उपस्थित होते. अखेर बँक कर्मचारी पूनम देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "बीएसएनएलची इंटरनेट सुविधा बंद असल्याने व पावसामुळे साक्री येथूनच 'राऊटर' जळाल्याने उद्या सायंकाळपर्यंत यंत्रणा सुरळीत होईल." अशी प्रतिक्रिया "दैनिक सकाळ"शी बोलताना दिली.