जैताणेत वृक्षारोपणासह गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शिका वाटप

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : जैताणे (ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते व एकविरा मेडिकलचे संचालक योगेश सोनवणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गावातील दहावी, बारावीच्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अपेक्षित संच भेट देवून व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय परिसरात वृक्षारोपण करुन आपला वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा व युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा उपक्रम घेण्यात आला.

श्री. सोनवणे यांचा नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग असतो. वृक्षसंवर्धन ग्रुपमार्फत सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून ते जगविण्याचे काम त्यांच्यासह त्यांच्या मित्र परिवाराने हाती घेतले आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री. सोनवणे व त्यांचे मित्र नंदकुमार जाधव यांच्या संकल्पनेतून सावता ग्रुपतर्फे या आधीही जैताणे गावात अमरधामजवळ पथदिवे लावले, नंदू जाधव यांच्या जन्मदिनानिमित त्या महिन्यात मुलींना जन्म दिलेल्या मातांचा साडी-चोळी व रोख रक्कम भेट देवून सन्मान केला. एका दलित वृद्ध महिलेची झोपडी जळून संपूर्ण संसार खाक झाला होता. त्या महिलेला संसारोपयोगी साहित्य देवून मदतीचा हात पुढे केला. अशी सामाजिक बांधीलकी जोपासणारी कामे या ग्रुपने केली आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे परीसरातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमास महात्मा फुले वाचनालयाचे अध्यक्ष अनिल सोनवणे, सावित्रीबाई फुले पतसंथेचे संस्थापक पंढरीनाथ सोनवणे, तुषार खैरनार, महेंद्र जाधव, योगेश सोनवणे, नंदकुमार जाधव, तुकाराम खलाणे, योगेश खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनंजय गवळे, हेमंत सोनवणे, प्रमोद खैरनार, महेंद्र वाघ, रविंद्र खैरनार, महेश खैरनार, प्रकाश खैरनार, अमोल जाधव आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रमोद खैरनार यांनी केले.

Web Title: dhule news jaitane birthday students and plantation