धुळे तालुक्यात भर पावसाळ्यात पिकांना टँकरने पाणी

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

महिनाभरापासून पावसाचा अभाव
धुळे व शिंदखेडा तालुक्यात एक महिन्यापासून जोरदार पाऊस झालेला नाही. पारसाअभावी पिकांची स्थिती बिकट झाली आहे. मुग, उडीद, तुर, चवळी हा कडधान्याचा हंगाम येण्यापूर्वीच आटोपला आहे. मका , बाजरी, भूईमुग, ज्वारी व कापूस ऊन धरत आहेत. करपण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. पिण्याच्या पाण्यासह चार्‍याची स्थितीही गंभीर आहे.

कापडणे (जि.धुळे) : पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरु झाला आहे. महिनाभरापासून पाऊस नाही. खरीप पिके ऊन धरु लागली आहेत. कडधान्याचा हंगाम पुर्णतः वाया गेला आहे. उरलेली इतर पिके वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. कापसाला डब्याने पाणी दिले जात आहे. मध्यमवर्गीय शेतकरी टँकरने पाणी घालून पिके जगविण्याची धडपड करीत आहेत. धुळे तालुक्यात सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळसदृश्य परीस्थिती निर्माण झाली आहे.

पिकांना टँकरने पाणी
उन्हाळ्यात आटलेल्या विहिरी व कुपनलिका अद्यापही कोरड्याच आहेत. दुष्काळातही विहिर व कुपनलिका आटत नाहीत. अशा विहिरीही आटल्या आहेत. पिकांना टँकरने पाणी दिले जात आहे. कापसाला डबा डबा पाणी टाकले जात आहे. विकतच्या पाण्याने पिके जगविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे. एका टँकरसाठी पाचशे मोजावे लागत आहेत.

पावसासाठी पारंपारीक प्रथांची आळवणी
पाऊस पडावा यासाठी धोंडी धोंडी पाणी दे, महादेवाची पिंड पाण्यात बुडविणे, भिक मागणे, प्रतिकात्मक अंत्यविधी काढणे, होमहवन करणे आदी प्रथांद्वारे पावसाची आळवणी केली जात आहे.

उत्तर महाराष्ट्र

पंचवटी - आम्ही पोलिस असून, तुमच्या घरात राहात असलेल्या मुली वेश्‍याव्यवसाय करतात, असे समजल्यावरून कारवाई करण्यासाठी आलो आहोत....

02.00 PM

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू व डेंगीचा विळखा पडला असताना त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी महापालिकेत बहुमत असलेल्या सत्ताधारी...

02.00 PM

पंचवटी - त्र्यंबकेश्‍वर परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली. खबरदारीचा उपाय म्हणून...

02.00 PM