शिपाई म्हणून काम करणारे 85 वर्षीय आबा सत्काराने भारावले

Madhukar Girase felicitation
Madhukar Girase felicitation

शिंदखेडा (धुळे) : पायजामा शर्ट आणि डोक्यावर लाल टोपी असा साधा ड्रेस असलेले 85 वर्षाचे आबा स्टेज वर चढतात... व्यासपीठावरील प्रमूख पाहूणे त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देतात त्याच वेळी निवेदक त्यांच्या कार्याची माहीती सांगतात आणि एकच टाळ्यांचा कडकडाट होतो. आबांच्या डोळ्यात अश्रू तरळतात...त्यांचा त्यांच्या आयूष्यात प्रथमच सत्कार होत असतो.

रोटरी क्लबच्या कार्यक्रमातील सत्काराचे हे चित्र.. सत्कारार्थी आहेत येथील माळीवाड्यात राहणारे मधू आबा...मधूकर गिरासे हे त्यांचे नाव.

"मी खूप भारावलो आहे, खूप आनंदी आहे शेवटच्या श्वासापर्यंत असेच प्रामाणिक काम करत राहीन " असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. योग्य सत्कार अशा आपसूकच ऊपस्थितांतून प्रतिक्रीया उमटतात. येथील बिजासनी मंगल कार्यालयात रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ झाला. यात अॅड. हर्षल अहिरराव यांची अध्यक्ष तर देवेंद्र नाईक यांची सेक्रेटरी म्हणून निवड झाली. रोटरीचे पूणे येथील रोटरी गव्हर्नर मोहन पालेशा, धुळे जिल्ह्याचे आशिष अजमेरा आणि प्रफूल्ल शिंदे यांचे उपस्थितित त्यांनी दिमाखात 
पदग्रहण केले. दर वर्षी या सोहळ्यात शहरातील सामान्य मात्र वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्याची रोटरीची प्रथा आहे. त्याला व्होकेशनल सत्कार नाव दिले आहे.

त्यानूसार या वेळी मधूकर गिरासे या सत्काराचे मानकरी ठरले. गिरासे ह्याच्या कूटूंबाची अत्यंत गरीब परीस्थिती. गेल्या साठ वर्षापासून ते येथिल विविध कार्यकारी सोसायटीत शिपाई म्हणून काम करतात. पगार अगदीच तुटपूंजा अशा पगारातही गिरासे यांनी आपले काम सोडले नाही. या साठ वर्षाच्या काळात कधी रजा ही घेतली नाही. प्रत्येक आलेल्या शेतकऱ्याला कर्जा संदर्भात मार्गदर्शन करणे त्याचे कडे असलेल्या कागदपत्रांचे झेराॅक्स करून आणून देणे किंवा त्याला लागेल ती मदत प्रामाणिकपणे करणे या शिवाय सोसायटीची कर्ज वसूली करण्यासाठी शहरासह परीसरातील गावांमधे त्यांच्या घरोघरोघरी फिरणे आणि वसूली करूनच आणणे आदी कामं ते अगदी प्रामाणिकपणे करतात. आजचे त्यांचे वय आहे केवळ पंच्याऐंशी. या वयात घरातच बसून नातू पणतू सोबत खेळणे, दवधर्म करणे हे चित्र सर्वत्र असते. मात्र गिरासे त्याला अपवाद ठरले. या वयातही ते रोज किमान आठ ते दहा किलोमिटर कर्ज वसूलीसाठी पायी फिरतांना दिसतात. रोज हजारो रूपये वसूल करून आणतात.गेल्या साठ वर्षात एकही रूपयाची गफलत नाही. शेतकरीही अगदी विश्वासाने त्यांच्याकडे हजारो रूपये देवून आबा पावती नंतर दिली तरी चालेल असे विश्वासाने सांगतात. आबा आलेली रक्कम विश्वासाने सोसायटीत भरून आठवणीनै पावती नेवून देतात. शहरासह तालुक्यातील शेतकरी त्यांना आदराने मधू आबा ओळखतात.

गिरासे यांचे सह दहावीत शंभरटक्के गूण मिळवणारी कु.निकीता जगदिश पाटील, बेस्ट रोटरीयन म्हणून रविंद्र माळी आणि बैस्ट प्रेसिडंन्ट म्हणून महेश पाटील यांचाही सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.मावळते अध्यक्ष संजय पारख यांनी नूतन पदाधिकार्यांकडे सूत्र सोपविली.तेविस पदाधिकार्रांनी यावेळी पदग्रहण केले.मावळते सेक्रेटरी ऊज्वल पवार यांनी अहवाल सादर केला.प्रा संदिप गिरासे आणि प्रा.जी के परमार यांनी आभार मानले.कार्यक्रमाला प्रा सूरेश देसले, ऊपनगराध्यक्ष ऊल्हास देशमूख, डाॅ ए बी बोरकर, डाॅ देवेंद्र पाटील, ऍड वसंतराव भामरे, डाॅ केदार फूलंब्रीकर ,डाॅ प्रदीप गिरासे, डाॅ सूजय पवार, आदी ऊपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com