धुळे : नव्या सीईओंचा जिल्ह्यात अचानक भेटींचा धडाका

जगन्नाथ पाटील
शनिवार, 17 जून 2017

धुळे जिल्हा परिषदेत नव्याने नियुक्त झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. यांनी विविध विभागांना पूर्वकल्पना न देता अचानक भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे.

कापडणे - धुळे जिल्हा परिषदेत नव्याने नियुक्त झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. यांनी विविध विभागांना पूर्वकल्पना न देता अचानक भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे.

गंगाथरण यांनी सध्या जिल्हा परिषदांचा विद्यालयांना भेटी देण्याचे सत्र सुरू केले आहे. आज (शनिवार) धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील प्र.ल. आणि कुंडाणे येथील शाळांना त्यांनी अचानक भेटी दिल्या. यावेळी त्यांनी पोषण आहार कक्ष आणि स्वच्छता गृहांची निरखून पाहणी केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारून त्यांची गुणवत्ताही तपासून पाहिली. उपस्थित शिक्षकांना त्यांनी योग्य ते सूचना वजा आदेश दिले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी सावध राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी अशा अचानक भेटींचा धडकी घेतल्याचे चित्र आहे.

'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
नगरजवळ 1 कोटींचा गांजा जप्त
कुमार विश्वासांविरोधात 'आप' कार्यालयाबाहेर पोस्टर्स
लग्नाच्या नाट्याची मनोरंजक कहाणी टी टी एम एम (तुझं तू माझं मी)
पानसरे हत्या: 21 महिन्यांनी समीरला जामीन

पुणे: उरूळीकांचनजवळ महिलेवर गाडीमध्ये सामुहिक बलात्कार
लातूर जिल्ह्यात एटीएसचे छापासत्र; टेलिफोन एक्‍सेंजचा अड्डा उद्ध्वस्त
काश्मीर: बीजबेहरा येथे सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला
नाशिक: जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू
मुंबई: बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ताब्यात
इंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्ड सोहळा अमेरिकेमध्ये