पंचायतराज समितीची नेर येथे अचानक भेट; गटारी कामांबद्दल समाधान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

धुळे जिल्ह्यात पंचायतराज समितीने विविध गावात अचानक भेटी देण्याचे सत्र सुरू केले असून गुरुवारी नेर येथे भेट देऊन भूमिगत गटारी कामांसह कामे पाहून समाधानही व्यक्त केले.

नेर (ता. धुळे) - धुळे जिल्ह्यात पंचायतराज समितीने विविध गावात अचानक भेटी देण्याचे सत्र सुरू केले असून गुरुवारी नेर येथे भेट देऊन भूमिगत गटारी कामांसह कामे पाहून समाधानही व्यक्त केले.

त्या अनुषंगाने नेर गावात विविध कामांची पाहणी करण्यात आली. त्यात नेरला पाणीपुरवठा करणारी विहीर , 25/15 हेड योजनेखालील डांबरीकरण, चौदाव्या वित्त आयोगांतर्गत येणारी कामे व भूमिगत गटारींच्या कामांची पाहणी केली. त्यात विशेष म्हणजे नेर येथील भूमिगत गटारींचे कामांचा दर्जा पाहून समितीने आनंद व्यक्त करत गटारींच्या कामांचा पॅटर्न पूर्ण राज्यभरात राबवण्याचा संकल्प केला. अशा प्रकारच्या गटारींमुळे रोगराई पसरणार नाही, असेही समितीने यावेळी सांगितले. यावेळी पंचायत राज कार्यकारी समिती प्रमुख उन्मेश पाटील, हेमंत पाटील, विकास कुंभारे, उपसचिव म. वि. स. विलास आठवले, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन उपसचिव ग्रामविकास व्ही. डी. शिंदे, प्रतीवेदक शरद जुन्नरे हे अधिकारी उपस्थित होते. सर्व समितीने नेर सरपंच शंकरराव खलाणे यांनी केलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. त्यावेळी नेर सरपंच शंकरराव खलाणे, धुळे शिवसेना तालुकाध्यक्ष मनिष जोशी, नेर ग्रामपंचायत सदस्य देविदास माळी, नामदेव बोरसे, सिद्धार्थ जैन, निर्मल आखाडे, वसंत देशमुख, संजय चौधरी ,यादव गवळे, संतोष खलाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.