निजामपूर-जैताणे बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील बसस्थानकावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी होत असून, मोकाट जनावरे व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील बसस्थानकावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी होत असून, मोकाट जनावरे व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे.

खाजगी वाहनचालकांसह बसचालकही बेदरकारपणे वाहने चालवितात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. परिवहन विभागाने अशा बेदरकार व बेशिस्त बसचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निजामपूर-जैताणे येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बसचालकांचे समुपदेशन होणेही तेवढेच गरजेचे आहे. बसचालकांच्या हातात किमान 50 लोकांचा जीव असतो. त्यामुळे अन्य वाहनचालकांच्या तुलनेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. याचे भान ठेवणेही अपेक्षित आहे. किमान गावानजीक तरी वाहने हळू चालविली पाहिजेत. ही साधी गोष्ट सर्वांना कळायला हवी.

बसस्थानकावर कायमस्वरूपी दोन पोलिसांची नेमणूक झाली पाहिजे. संजयनगर पेट्रोल पंपापासून पासून आखाडे रस्ता, वासखेडी फाटा, खुडाणे चौफुली, बसस्थानक, म्हसाई प्लाझा जवळील पेट्रोल पंप ते इंदिरानगर तसेच खुडाणे चौफुली ते जैताणे ग्रामपंचायत चौक, रुपाली चौक, चैनी रोड आणि निजामपूरातील चिंच चौक ते मेनरोडमार्गे लामकानी रोडपर्यंत ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यात पुन्हा रस्त्यांवरील खड्डे चुकविण्याच्या नादात जास्त अपघात होतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह संबंधित विभागांनीही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.