निजामपूरला मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

निजामपूर (ता.साक्री) : 'उम्मीद' फाउंडेशनतर्फे विष्णूनगरच्या प्रांगणात आयोजित सामूहिक विवाहसोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
निजामपूर (ता.साक्री) : 'उम्मीद' फाउंडेशनतर्फे विष्णूनगरच्या प्रांगणात आयोजित सामूहिक विवाहसोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे व निजामपूर (ता. साक्री) येथील 'उम्मीद' फाउंडेशनतर्फे रविवारी (ता.18) दुपारी विष्णुनगरच्या प्रांगणात द्वितीय सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला. आमदार डी. एस. अहिरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पोपटराव सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, जिल्हा परिषद सदस्य विलास बिरारीस, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, निजामपूरचे सरपंच प्रतिनिधी विजय राणे, प्रा. डॉ. रवींद्र ठाकरे, डॉ. हरिभाऊ ठाकरे, मुस्लिम पंच कमिटी जैताणेचे अध्यक्ष मुश्ताक शाह, निजामपूरचे अध्यक्ष आसिफ खान, ग्रामपंचायत सदस्य सलीम पठाण, चोपड्याचे सामाजिक कार्यकर्ते राजमोहम्मद सिकलगर, साक्रीचे माजी उपसरपंच याकूब पठाण, सामाजिक कार्यकर्ते युसुफ सय्यद, ताहीर मिर्झा, अयुब खाटीक, बाजीराव पगारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या सामुदायिक विवाहसोहळ्यात एकूण सात जोडपे विवाहबद्ध झाले. त्यात नाजीराबानो (जैताणे) व मोहम्मद मुर्तुजा (सुरत), समरीनबानो (निजामपूर) व इम्रानखान (धुळे), शहेनीलाबानो (नवापूर) व शाहनवाज सय्यद (नंदुरबार), अलफियाबानो (निजामपूर) व शाहरुख शेख (निजामपूर), अरशीन बानो (निजामपूर) व शाहरुख खान (दहीवेल), रुखसाना बानो (जैताणे) व सादिक खान (मोलगी), शबनम शदफ (मालेगाव) व अरशद शाह (मालेगाव) आदींचा समावेश आहे.

प्रत्येक जोडप्याकडून दहा हजार रुपये नाममात्र शुल्क घेण्यात आले. सातपैकी दोन जोडपी अनाथ असल्याने फाउंडेशनतर्फे त्यांचा मोफत व निशुल्क विवाह लावून देण्यात आला. प्रत्येक जोडप्यास कपाट, रॅक, गादी, पलंग, चार फायबर खुर्च्या व 51 भांडी आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. प्रत्येक जोडप्याकडील किमान अडीचशे वऱ्हाडी मंडळी व नातेवाईकांसह उम्मीद फाउंडेशनतर्फे सुमारे दोन ते अडीच हजार लोकांच्या भोजनाची सोय करण्यात आली. अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष तौफिक शेख यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

आमदार चंद्रकांत रघुवंशी व पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी 'उम्मीद'च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. धुळे येथील डॉ. जावेद इक्बाल यांनी सूत्रसंचालन केले. 'उम्मीद'चे अध्यक्ष तौफिक शेख यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक तथा उम्मीद फाउंडेशनचे अध्यक्ष तौफिक शेख, कार्याध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष साजिद सिकलकर, सचिव अजहर हुसेन, सहसचिव शरीफ पिंजारी, प्रसिद्धिप्रमुख जाकीर शाह, संचालक मुस्तकीम शाह, रहीम शेख, शरीफ मिर्झा, वसीम शेख, आसिफ शेख, सल्लागार मुनाफ शाह, इम्रान खाटीक, इम्रान पठाण, शकील शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com