निजामपूरला राजेश्वरबुवा उपासनी स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धा

निजामपूर (ता. साक्री) : येथील आदर्श विद्या मंदिरात कै. राजेश्वरबुवा उपासनी स्मृतिनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मनोगत व्यक्त करताना स्पर्धक.
निजामपूर (ता. साक्री) : येथील आदर्श विद्या मंदिरात कै. राजेश्वरबुवा उपासनी स्मृतिनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मनोगत व्यक्त करताना स्पर्धक.

निजामपूर (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संस्थापक संचालक स्व. राजेश्वरबुवा उपासनी यांच्या स्मरणार्थ नुकतीच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी "महाराष्ट्रातील संतपरंपरा व बुवाबाजीचे वाढलेले स्तोम" या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

बारावी विज्ञान शाखेच्या प्रीती लुका बच्छाव हिने प्रथम क्रमांक, अकरावी विज्ञान शाखेच्या गायत्री आबा धनगर हिने द्वितीय क्रमांक तर इयत्ता नववीच्या अनुराग भगवान जगदाळे ह्याने तृतीय क्रमांक पटकावला. एकूण दहा स्पर्धक सहभागी झाले होते.

मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, प्रा. रामचंद्र सोंजे यांनी प्रतिमापूजन केले. डॉ. एल. डी. पाटील, प्रा. कुलकर्णी व श्री. पगारे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले व मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. भामरे यांनी मनोगत व्यक्त केले व स्पर्धेचा निकाल घोषित केला. लक्ष्मीकांत अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. वैभव येवले यांनी आभार मानले. मीनाक्षी पाटील, मनोज ठाकूर यांनी संयोजन केले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com