धुळे जिल्ह्यात दहा लाखाच्या पुरस्काराचे दोन वेळा वितरण..!

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 14 जुलै 2017

महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेअंतर्गत दहा लाखांचा तंटामुक्त गाव पुरस्कार हा सर्वाधिक रक्कमेचा पुरस्कार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुरस्कार दिला जातो. राज्यात सात लाखापर्यंतचे पुरस्कार दिले गेले आहेत. प्रथमच दहा हजारापेक्षा जास्त लोकसंख्येचे एकमेव कापडणे तंटामुक्त झाले आहे. म्हणूनच मोठा पुरस्कार समजला जातो.

कापडणे (जि. धुळे) - येथील ग्रामपंचायतीला महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेअंतर्गत दहा लाखांचा तंटामुक्त गाव पुरस्कार दोन वेळा प्रदान करण्यात आल्याने परिसरात आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कापडणेला सुरुवातीला गटप्रमुख प्रकाश भारसाकळे, आमदार अनिल तटकरे, आमदार हेमंत पाटील, आमदार विकास कुंभारे, सचिव सावकारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, गटनेते भगवान पाटील, सरपंच भटू पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती नुतन पाटील, पंचायत समिती सदस्या उषा माळी, उपसरपंच प्रभाकर पाटील आदीं उपस्थित होते. तर दुसऱ्यांदा पुन्हा याच पुरस्काराचे गुरुवारी सोनगीरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या हस्ते वितरण झाले. दोन्ही पुरस्कार देताना धनादेश एक जुलैलाच देण्यात आला आहे. दोन वेळा पुरस्कार वितरण झाल्याने मोठी चर्चा तालुक्‍यातील रंगली आहे.

राज्यातील सर्वाधिक मोठा पुरस्कार
महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेअंतर्गत दहा लाखांचा तंटामुक्त गाव पुरस्कार हा सर्वाधिक रक्कमेचा पुरस्कार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुरस्कार दिला जातो. राज्यात सात लाखापर्यंतचे पुरस्कार दिले गेले आहेत. प्रथमच दहा हजारापेक्षा जास्त लोकसंख्येचे एकमेव कापडणे तंटामुक्त झाले आहे. म्हणूनच मोठा पुरस्कार समजला जातो.

आनंदी आनंद
दहा लाखाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर येथील सर्व राजकिय पक्ष , संघटना व सर्वस्तरातून आनंद व्यक्त होत आहे. समितीचे अध्यक्ष नवल पाटील म्हणालेत, यापुढील काळातही गावात शांतता अबाधीत राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

दोन वेळा पुरस्कार वितरण
तंटामुक्त गाव पुरस्कार वितरण दोन वेळा झाले. शासनाचे प्रतिनीधी हा पुरस्कार वितरीत करण्याचा कार्यक्रम झाला. आता पुन्हा सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारण्यात आला आहे. प्रत्यक्षात दहा लाख रक्कमेचा धनादेश एक जुलैलाच मिळाला. अन तो वटल्याचे समजते. अशा स्थितीत दोन वेळा पुरस्कार वितरणाचे कोडे ग्रामस्थांना पडले आहे. विविध तर्क काढून हे कोडे सोडविण्यातही काही गुंतले आहेत.

■ ई सकाळवरील महत्वाच्या ताज्या बातम्या
परभणी: दूबार पेरणीच्या संकटाने युवकाची आत्महत्या
साहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का?
बारामती-फलटण रेल्वेमार्ग संपादनासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा
सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावर माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प
मराठवाड्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याने संपविले जीवन
गेल्या महिन्याभरात साडेतीन हजार "चाईल्ड पोर्नोग्राफी' साईट्‌स बंद
नांदेडमध्ये वाहतूक शाखेची अडीच महिण्यात दमदार कारवाई
पुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात
'एलआयसी'चे एयर इंडिया करू नका !; 'जीएसटी'ही काढा
भारतातील "फेसबुक युजर्स'ची संख्या जगातील सर्वोच्च...