जवाहरलाल वाचनालयातर्फे शिष्यवृत्ती परीक्षा; 700 विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

निजामपूर (धुळे): येथील जवाहरलाल वाचनालयातर्फे नुकतीच आठवी ते दहावी व अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. सुमारे 700 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, उपाध्यक्ष कमलेश शाह, सचिव नितीन शाह, संचालक मनोहर राणे आदींसह वाचनालयाचे संचालक मंडळ व कर्मचारी आयोजक होते.

ही शिष्यवृत्ती परीक्षा स्व. जगन्नाथ शाह, स्व. मणीलाल शाह, स्व. विष्णुदास शाह, स्व. जगन्नाथ वाणी, स्व. मुरलीधर वाणी, स्व. ईश्वरलाल शाह, स्व. इंदुमती राणे, स्व. प्रभावती उपाध्ये आदींच्या स्मरणार्थ घेण्यात आली. यात गुणवत्तेनुसार आठवी ते बारावीच्या एकूण 32 विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. तर 5 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. या परीक्षेत आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, महात्मा फुले विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय व भानुबेन वाणी पब्लिक स्कुल आदी शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासह त्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह, संचालक मनोहर राणे आदी उपस्थित होते. आदर्श विद्या मंदिराचे मुख्याध्यापक जे. पी. भामरे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तर जवाहरलाल वाचनालयाचे कर्मचारी चंद्रकांत शिंपी, प्रतीक शाह, जयवंत शाह आदींनी परिश्रम घेतले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात