शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिनिमित्त १५१ कार्यकर्त्यांचे रक्तदान

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिनिमित्त १५१ कार्यकर्त्यांचे रक्तदान
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिनिमित्त १५१ कार्यकर्त्यांचे रक्तदान

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे (ता. साक्री) येथील खुडाणे चौफुलीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्त भगवा साप्ताहांतर्गत बुधवारी (ता. २२) सकाळी दहापासून ते सायंकाळी सातपर्यंत शिवसेना व युवासेनेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात मुस्लिम समाजबांधवांसह १५१ शिवसैनिक, युवासैनिक व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले. धुळे येथील अर्पण रक्तपेढीने रक्तसंकलन केले.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संपर्क उपप्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, विद्यमान जिल्हा उपप्रमुख भुपेश शाह, तालुका प्रमुख व कासारेचे सरपंच विशाल देसले, तालुका उपप्रमुख पंजाबराव गांगुर्डे, भरत जोशी, नियोजित पिंपळनेर तालुका प्रमुख दत्तू गुरव, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. पंकज गोरे, विधानसभा संघटक पंकज मराठे, शिवसैनिक प्रवीण वाणी, त्रिलोक दवे, भैय्या गुरव, पांडू गुरव आदींच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले.

मुस्लिम समाजबांधवांनीही केले रक्तदान...
पक्षीय राजकारण बाजूला ठेवले तर मुस्लिम समाजातही बाळासाहेबांना मानणारा त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्याचीच पावती म्हणून सामाजिक कार्यकर्ते युसुफ सय्यद यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गौरवोदगार काढत मुस्लिम कार्यकर्त्यांसह शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यानंतर रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व टी-शर्टचे वाटप करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांना आयोजकांतर्फे अल्पोपहारचेही वाटप झाले.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवसेना विभागप्रमुख महेश खैरनार, उपविभागप्रमुख योगेश महाले, जैताणे शहरप्रमुख रवींद्र खैरनार, युवासेना तालुकाप्रमुख दर्शन परदेशी, निजामपूर शहरप्रमुख प्रशांत चव्हाण, जैताणे शहरप्रमुख पप्पू धनगर, शरद पेंढारे, भूषण पगारे, अर्जुन अहिरे, राजेंद्र मराठे, उद्धव मराठे, ज्ञानेश्वर गुरव, प्रशांत मोहने, तुकाराम खलाणे, धनंजय गवळे, युवराज जाधव, संदीप जाधव, करण पवार, पावबा बोरसे, निलेश चव्हाण, भगवान अहिरे, जगदीश सूर्यवंशी, अनिल महाले, भीमराज बागुल, गोपाल पगारे, शरद माळके, किशोर न्याहळदे, रवींद्र बोरसे, मयूर सोनवणे, केतन मोहने, मयूर पवार, रितेश मराठे, राहुल मराठे, मयूर मराठे, गणेश पाटील, राहुल पाटील, हेमंत बेंद्रे, शाम गुरव, तुषार भामरे, सुनील माळी, ज्ञानेश्वर गायकवाड आदींसह स्थानिक शिवसैनिक व युवासैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com