ग्राहक पंचायतीचा राज्यव्यापी मेळाव्याचा समारोप

songir
songir

सोनगीर : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या राज्यव्यापी मेळाव्यात ग्राहक पंचायतीचे जनक बिंदुमाधवराव जोशी यांच्या शासनाकडून यथोचित सन्मान व्हावा म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा; पेट्रोलपंपावर ग्राहकांना कमी पेट्रोल देऊन लूट केली जाते. ती थांबवण्यासाठी पारदर्शक नळीद्वारे पेट्रोल मिळावे; शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावे, असे तीन ठराव संमत झाले. बाजारपेठेत नाडल्या जाणाऱ्या ग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक पंचायत झोकून देऊन कार्य करेल असे आश्वासन ग्राहक पंचायतीचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी दिले. 

येथील आनंदवन संस्थान सभागृहात आज (ता. 20) दोन दिवसीय ग्राहक पंचायतीचे राज्यव्यापी मेळाव्याचा  समारोप झाला. त्याप्रसंगी डॉ. लाड बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन काल डॉ. भामरे यांचे हस्ते झाले होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून  राज्य संघटक सर्जेराव जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष मार्तंडराव जोशी, विभागीय संघटक अरुण भार्गवे, सहसंघटक डॉ. योगेश सुर्यवंशी, माजी महापौर मंजुळा गावित,  पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार, राज्य सचिव अर्जुन वाघमारे, विनायक पाचपुते, आर. के. माळी, राज्य सहसंघटक मेघाताई कुलकर्णी, अनिल जोशी, उपस्थित होते. 

ग्राहकांत जागृती नसल्याने व ते संघटीत नसल्याने त्यांची लुबाडणूक होते.अशा ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य करून ग्राहकांचे संवर्धन, प्रबोधन व मार्गदर्शन करणारी ग्राहक पंचायत ही एकमेव संस्था आहे. काहींनी ग्राहक पंचायतीला विरोध केला पण त्यांना धुळ चारत पुढील वर्षांपर्यंत ग्राहकांसाठी झटणारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही एकमेव संस्था असेल असे ठोस मत डॉ. लाड यांनी व्यक्त केले.    दोन दिवसीय मेळाव्यात प्रा. डॉ. श्रीधर देसले यांनी शेतीमाल व बाजारमूल्य, अनिल जोशी यांनी ग्राहक मार्गदर्शन केंद्र, अजय भोसरेकर यांनी आॅनलाईन नोंदणी, प्रा. प्रकाश पाठक यांनी ग्राहकतीर्थ व ग्राहक पंचायत, सर्जेराव जाधव यांनी ग्राहक पंचायत कार्यपद्धती व फलश्रुती, पवन अग्रवाल यांनी जीएसटी, सुरेश वाघ यांनी वीज ग्राहक तक्रार मंच या विषयावर व्याख्यानातून मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन शेखर देशमुख, आरीफखाँ पठाण यांनी केले. 

धुळे जिल्हा कार्यकारिणीचे  रतनचंद शहा, रवींद्र महाजनी, डाॅ.अजय सोनवणे, धुळे तालुका अध्यक्ष एम. टी. गुजर यांचेसह ग्राहक पंचायतीचे येथील अध्यक्ष डाॅ कल्पक देशमुख, एल. बी. चौधरी, किशोर पावनकर, राजूबाबा पाडवी, शरद पाचपुते, शिवनाथ कासार, ज्ञानेश्वर चौधरी, नंदकिशोर कोठावदे, के. के. परदेशी, मनोज जैन, प्रसाद जैन, राहुल देशमुख, दीपक पाटील, कल्पेश पाटील, किशोर लोहार,  विशाल कासार, श्रीराम सैंदाणे, रोशन जैन, शरद चौक, श्यामकांत गुजर, समाधान पाटील, हेमंत सोनवणे आदींनी संयोजन केले. 

सोनगीरला ग्राहक पंचायतीच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे आकाशी झेपावणारा गरूड, पायात कलश व वर जनसमुदाय असे नवीन मानचिन्ह सुरू झाले. सर्वांना सोबत घेऊन उत्तुंग कार्य करणे असे मानचिन्हाचा (लोगो) अर्थ आहे. तसेच येथूनच ग्राहक पंचायतीचे मुखपत्र ग्राहकतीर्थाचे प्रकाशन झाले. बिंदुमाधव जोशी यांचे निधन झाले असले तरी कधीच कैलासवासी शब्द त्यांच्यामागे लावला जाणार नाही. असे ठरले. कारण ते आजही आपल्यातच आहेत ही भावना निर्माण व्हावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com