मुंबईच्या तज्ज्ञांकडून तीन हजार शालेय विद्यार्थ्यांची मस्तिष्क तपासणी

तुषार देवरे
गुरुवार, 20 जुलै 2017

एरव्ही महागडी फी, डाॅक्टरांकडे आठ दिवस नंबर लावणे; आदी समस्या पालकांना येतात. मात्र डाॅक्टरांचे पथकच थेट धुळेत येतात. त्यामुळे एक वैद्यकीय पातळीवरची महत्त्वपूर्ण सोय होत आहे. आवश्यकतेनुसार ईईजी,सीटी स्कॅन, एमआरआय, थेरपी प्रोग्रॅम तपासणी व औषध वाटप होत असते.

धुळे : देऊर जिल्हा परिषद व जय वकिल फाऊंडेशन तर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षात तीन हजार शालेय विद्यार्थ्यांची मोफत निदान व मस्तिष्क तपासणी करण्यात येत आहे.

शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मस्तिष्क आजार  असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी दरवर्षी बाळापूर च्या जिल्हा केंद्रावर केली जाते. या तपासणी मुळे जिल्ह्यातील गरीब पालकांना महत्वाची मदत झाली आहे. एक आशेचा किरण या शिबिराच्या माध्यमातून  पालक व विद्यार्थ्यांना मिळाला आहे. कारण गरीब पालकांना आर्थिक परिस्थिती मुळे व पुरेशी माहिती अभावी  पुढील उपचारासाठी जाता येत नाही. मात्र मुंबई च्या डाॅक्टरांचे जम्बो पथक या शिबिरासाठी पाच वर्षापासून अथक परिश्रम घेत आहेत. यात मतिमंद, आॅटिजम, मेंदूचा पक्षाघात, नसांचा आजार, मूव्हमेंट डिसऑर्डर, असणारया बालकांवर निदान व उपचार केले जातात.

एरव्ही महागडी फी, डाॅक्टरांकडे आठ दिवस नंबर लावणे; आदी समस्या पालकांना येतात. मात्र डाॅक्टरांचे पथकच थेट धुळेत येतात. त्यामुळे एक वैद्यकीय पातळीवरची महत्त्वपूर्ण सोय होत आहे. आवश्यकतेनुसार ईईजी,सीटी स्कॅन, एमआरआय, थेरपी प्रोग्रॅम तपासणी व औषध वाटप होत असते.

सामाजिक भावनेतून जम्बो पथकात मुंबई येथील * पीडियाट्रिक न्युरोलाॅजिस्ट डाॅ. अनैता  हेगडे, यांच्या सह  जसलोक आणी  वाडिया हाॅस्पिटलच्या तज्ज्ञ पथकातील डाॅ. सोनम कोठारी, डाॅ. रूचिता व्यास, डाॅ.इरावती पुरंदरे, डाॅ. तरीशी निमानी,* फिजिओथेरफिस्ट स्नेहल देशपांडे, विश्वेश बापट, देवर्षी  सुमानिया, मिनाक्षी फेरवानी, ऑक्युपेशनल थेरपिस्ट रश्मी देसाई, सायली परब,स्पीच थेरपिस्ट  जिग्नेश चौहान, श्वेता जाधव, *समन्वयक शिल्पा चव्हाण, *ईईजी टेक्निशियल स्नेहा देसाई, देशांशी गाला, योगेश सोनवणे, मुकेश कुमार, *डायटिशियन रिमा देसाई, *सोशल वर्कर काना पारधी, *वाॅलेन्टीयरस जिनाली मोदी, साची  दलाल, रोहन हेगडे आदिंचा समावेश आहे.

प्रत्येक सहा महिन्यात डाॅ. अनैता हेगडे या शिबिर घेत आहे. या मध्ये दर सहा महिन्याची महागडी औषधे गरीब पालकांना मोफत देतात. ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित चालता येत नाही. त्यांच्या पायांचे मोजमाप घेऊन  स्लिंट कॅलिपर मोफत देण्यात येतात.  

दृष्टीक्षेपात-
2012 ते 2017 दरम्यान वर्षात शिबिरात झालेली तपासणी व वैद्यकीय सुविधा 

*विद्यार्थी संख्या-3070
*स्लिंट कॅलिपर-143
*ईईजी तपासणी-209 
*एमआरआय तपासणी-64
*इतर तपासण्या-89
*औषधे-2698
*थेरपी सेवा -1775

पालकांना मार्गदर्शक सूचना 
*शिबिरात सांगितल्यानुसार विद्यार्थ्यांना आहार  द्यावा.
*अर्थोपेडीक स्लिंट दिले आहे; त्याचा पूर्ण वापर करा.
*फीट्स येणार्या विद्यार्थ्यांच्या  औषधात खंड पडू देऊ नये. अन्यथा मागील  ट्रिटंमेंन्ट चा काही उपयोग होत नाही. 
*फिजिओथेरपी, स्पीचथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी सेवा  पालकांनी नियमित विद्यार्थ्यांची करावी. 
*दररोज चे निरिक्षण करून शिबिरात माहिती डाॅक्टरांना देणे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: