शिक्षकांना मान्यता न दिल्यास तीव्र आंदोलन: प्रा. अनिल देशमुख

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

राज्याचे सरचिटणीस प्रा. संजय शिंदे (नाशिक) यांच्यासह प्रा.डी.पी. पाटील, प्रा. एन.टी. ठाकरे (धुळे), प्रा. विकास सोनवणे (जळगाव), प्रा. डी.सी. पाटील (शहादा), प्रा. एन.व्ही. वळींकार (जळगाव), प्रा. अनिल महाजन, प्रा. आर.एन. शिंदे (नाशिक) व प्रा. बी.जी. बागुल (नंदुरबार) आदींसह धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : 2 मे 2012 नंतर नियुक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसह विनाअनुदानित व पायाभूत पदांना शासनाने विनाअट मान्यता न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा निर्वाणीचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. अनिल देशमुख (मुंबई) यांनी धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात दिला. धुळे येथील झेड. बी. पाटील महाविद्यालयात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

राज्याचे सरचिटणीस प्रा. संजय शिंदे (नाशिक) यांच्यासह प्रा.डी.पी. पाटील, प्रा. एन.टी. ठाकरे (धुळे), प्रा. विकास सोनवणे (जळगाव), प्रा. डी.सी. पाटील (शहादा), प्रा. एन.व्ही. वळींकार (जळगाव), प्रा. अनिल महाजन, प्रा. आर.एन. शिंदे (नाशिक) व प्रा. बी.जी. बागुल (नंदुरबार) आदींसह धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"शिक्षणमंत्री मा. तावडे तुमचा शिक्षकांवर भरोसा नाय काय" असेही ते विनोदाने म्हणाले. आयटी शिक्षकांना मान्यता, जुनी पेन्शन योजना व सातवा वेतन आयोग लागू करणे, कनिष्ठ महाविद्यालयीन युनिट स्वतंत्र करणे, उपप्राचार्यपद कार्यान्वित करुन वेतनश्रेणी लागू करणे यासह संघटनेच्या विविध 25 प्रलंबित मागण्यांसंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनाही मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. सद्या राज्यात शिक्षकांच्या मनात शासनाच्या शैक्षणिक ध्येय-धोरणांबाबत तीव्र नाराजी पसरली असून त्याची किंमत आगामी काळात शासनाला चुकवावी लागेल असेही ते म्हणाले. शासनातर्फे दररोज काढण्यात येणाऱ्या नवनवीन परिपत्रकांमुळे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांच्या मनावर त्याचा दूरगामी परिणाम होतो. म्हणून शासनातर्फे 29 ऑगस्टला जारी करण्यात आलेले जाचक पत्र मागे घेण्यात यावे असेही त्यांनी नमूद केले.

प्रा. संजय शिंदे, प्रा. बी.ए. पाटील, प्रा. डी.पी. पाटील, प्रा. एन.टी. ठाकरे, प्रा.एस.एन. पाटील प्रा. एस.जी. शिरसाठ आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले..

Web Title: Dhule news teachers agitation