धुळेः 30 वर्षांपासून मूर्तिकलेत रमले जैताणेतील तुकाराम ठाकरे

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे(ता.साक्री) येथील धनगर समाजाचे कार्यकर्ते तुकाराम नका ठाकरे हे गेल्या 30 वर्षांपासून मूर्तिकलेत रमले असून श्रीगणेशासह कानुबाई मातेच्या मूर्त्याही ते लीलया साकारतात. पत्नी आणि मुलांसह त्यांचा संपूर्ण ठाकरे परिवार या कलेत रममाण झाला आहे.

शालेय जीवनापासूनच आवड...
तुकाराम ठाकरे यांना इयत्ता आठवी-नववीपासूनच या कलेची गोडी निर्माण झाली. त्यांचे मोठे बंधू बापू नका ठाकरे यांच्यापासून त्यांना ही कला अवगत झाली. मोठ्या बंधूंच्या प्रेरणेने गेली 30 वर्षे ते ह्या कलेची जोपासना करत आहेत.

संपूर्ण परिवाराचा सहभाग...
तुकाराम ठाकरे यांना या कलेत त्यांची पत्नी मंगलबाई ठाकरे यांच्यासह दोन्ही मुले पांडुरंग ठाकरे व मोहन ठाकरे, सुनबाई अश्विनी ठाकरे, मुली मनीषा मुजगे (विरदेल), सुनंदा भलकारे (जैताणे) व कलाशिक्षक असलेला पुतण्या मल्हारराव ठाकरे यांची मोलाची साथ लाभते.

मूर्तिकारासह उत्कृष्ट चित्रकारही...
तुकाराम ठाकरे हे मूर्तिकारासह उत्तम चित्रकारही आहेत. विविध देव-देवतांसह बळीराजाच्या बैलांच्या चित्रांचेही ते उत्कृष्ट रेखाटन करतात. मंदिरे व घरे यांना रंगरंगोटी करण्याचे कामही ते करतात. त्यांना अध्यात्म व समाजकार्याचीही आवड आहे. म्हणून त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला आहे.

प्रतिकुलतेतून यशस्वी वाटचाल...
तुकाराम ठाकरे हे अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या गरीब कुटुंबात जन्मले. आई-वडील घोंगडीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचे. गावातील सर्व धनगर समाज शेळीपालन, मेंढीपालन, शेती, व्यापार, नोकरी, घोंगडी व्यवसाय आदीत रमलेला असताना तुकाराम ठाकरे मात्र कलेत रमले. त्यांनी गरिबीचे भांडवल न बनवता हिमतीने यशस्वी वाटचाल केली आहे.

'जीएसटी'मुळे व "मेड इन चायना"मुळे व्यवसायावर परिणाम...
'जीएसटी'मुळे रंग महागले आहेत. त्यामुळे नाईलाजाने मूर्तींच्या किमती वाढतात. हल्ली भारतात 'मेड इन चायना' वस्तूंमुळे स्थानिक कलाकारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. शाळू मातीचे इकोफ्रेंडली गणपती आता जास्त कोणी घेत नसल्याने आम्हालाही काळासोबत चालावे लागते. म्हणून आम्हाला नाईलाजाने "पीओपी"च्या मुर्त्या बनवाव्या लागतात. अशी प्रतिक्रिया त्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

कलावंतांना शासकीय मदतीची गरज...
संपूर्ण आयुष्य एखाद्या कलेसाठी समर्पित करणाऱ्या कलाकारांना वृद्धापकाळासाठी शासनाने विशेष निधी उभारून भरीव आर्थिक मदत केली पाहिजे. त्याचबरोबर तरुण कलाकारांनाही परतफेडीच्या तत्वाने व्यवसायासाठी कर्ज अथवा आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले पाहिजे. अशी मागणीही त्यांनी "दैनिक सकाळ"शी बोलताना केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात