वैशाली लहामगे ठरल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या

वैशाली लहामगे ठरल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या
वैशाली लहामगे ठरल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या

धुळे: नगरच्या माहेरवाशीन आणि धुळे महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका वैशाली भूपेंद्र लहामगे या आज (मंगळवार) विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान झाल्या. महापालिका स्थापनेच्या 14 वर्षात या पदाचा बहुमान मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला नगरसेविका ठरल्या आहेत.

महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, शिवसेनेचे धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात आणि सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी, नेते, असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सौ. लहामगे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. शिवसेनेचे गंगाधर माळी यांचा विरोधी पक्ष नेते पदाचा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाने सौ. लहामगे यांना या पदाची संधी दिली. महापालिकेचा कार्यकाळ डिसेंबर 2018 ला संपुष्टात येत असताना शिवसेनेने प्रथमच महापालिकेत महिलेला विरोधी पक्ष नेते पदाची संधी दिल्याने या भूमिकेचे पक्षासह अनेकांकडून स्वागत झाले.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे यांनीही तीन वेळा नगरसेवक पदाचा बहुमान मिळाला आहे. सौ. लहामगे याही 2013- 2014 च्या निवडणुकीतून प्रथमच शिवसेनेच्या नगरसेविका झाल्या आहेत. विरोधी पक्ष नेते पदाबाबत कुठलेही महिला आरक्षण नसताना शिवसेनेने या पदासाठी महिलेला संधी दिल्याने या भूमिकेचे माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी स्वागत केले. महापौर कल्पना महाले यांनी विरोधी पक्ष नेतेपदी मान्यतेचे पत्र सौ. लहामगे यांना प्रदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com