वसंतराव नाईक महामंडळात पन्नास लाखांचा गैरव्यवहार

वसंतराव नाईक महामंडळात पन्नास लाखांचा गैरव्यवहार

धुळे - वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाच्या येथील कार्यालयात तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकासह १२ जणांनी खोटे लाभार्थी व कर्ज प्रकरणे करून ५० लाख रुपयांचा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई येथील तत्कालीन महाव्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापकासह १२ जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापक तथा चौकशी अधिकारी रवी गंगाराम गवल (४७ रा. जाधववाडी, औंरगाबाद) यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. तसा अहवाल त्यांनी व्यवस्थापकीय संचालकांना सादर केला. त्याच्या आदेशानुसार त्यांनी आज (ता.१३) येथील शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार धुळे येथील कार्यालय व मुंबई येथील महामंडळाच्या मुख्य कार्यालयात २०१३ ते १८ फेब्रुवारी २०१४ दरम्यान तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक तथा जिल्हा व्यवस्थापक, औरंगाबाद येथील दत्तू आश्रुबा सांगळे ( ५० रा. ढवळपुरी ता. पारनेर जि. नगर) यांनी खोटे व बनावट लाभार्थींचे कर्ज प्रकरणे तयार केले. ही प्रकरणे जिल्हा निवड समितीसमोर मंजुरीसाठी सादर केले नाहीत.  मुंबई येथील मुख्य कार्यालयातील  संबंधितांनीही प्रकरणांची पडताळणी केली नाही. कोणत्याही प्रकारची कर्ज प्रकरणे आलेली नसताना परस्पर मुख्य कार्यालयातून जिल्हा व्यवस्थापक, धुळे यांच्या नावाने ५० लाख रुपयांचा धनाकर्ष (डी.डी) पोच केला. तो दत्तू सांगळे हे जिल्हा व्यवस्थापक असताना १० लाभार्थी यांच्या नावाने प्रत्येकी ५ लाख रुपये रकमेचा स्वतःच्या स्वाक्षरीचा धनादेश तयार करून सादर केला.

तो संगनमताने योगेश सानप यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत स्वतःच्या नावाने बचत बॅंक खाते क्र. २०६०५ या खात्यावर धनादेश वटवून रक्‍कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काढून घेतली. यामुळे दत्तू सांगळे यांच्यासह बारा जणांनी खोटे व बनावट लाभार्थी तयार करून कर्ज प्रकरणाचे बनावट कागदपत्रे तयार करून महामंडळाचे ५० लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

संशयित बारा जण असे
दत्तू आश्रुबा सांगळे ( ५० रा. ढवळपुरी ता. पारनेर जि. नगर) तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक, औरंगाबाद. योगेश बाळासाहेब सानप, तत्कालीन उपव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, बीड. खासगी व्यक्ती परमेश्‍वर बसवंताप्पा जकीकोरे (रा. कळवा जि. ठाणे), खासगी व्यक्ती गणेश बाबासाहेब सानप (रा. नगररोड, बीड) हे दोघे मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकासोबत राहून डी.डी पोच करीत असत. आश्‍विन शंभरकर (रा. विवेकानंद, नागपूर) २०१३ मध्ये प्रादेशिक व्यवस्थापक, नागपूर, आधार मधुकर ताजणे (तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, नाशिक व सध्या सहाय्यक व्यवस्थापक, मुख्यालय, मुंबई), किशोर तुकाराम वाणी (२०१३ मध्ये वर्धा येथे तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक व सध्या सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य कार्यालय, मुंबई), संदीप कृष्णा पवार ( २०१३ मध्ये मुंबई- बांद्रा येथे महामंडळात जिल्हा व्यवस्थापक, सध्या सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य कार्यालय, मुंबई), पोपट बाजीनाथ गिते (२०१३ मध्ये महाव्यवस्थापकांच्या मुंबई येथील कार्यालयात चालक), प्रवीण दऱ्याप्पा कट्टे (२०१३ मध्ये महाव्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयात रोजंदारी कर्मचारी), रवींद्र शंकर कांबळे, महाव्यवस्थापक, मुंबई व प्रमोद निळकंठ चव्हाण, तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, मुंबई. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com