वीज कोसळून मायलेकींसह महिला ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

धुळे - गव्हाणे (ता. शिंदखेडा) शिवारात आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास वीज कोसळून शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या मायलेकी जागीच ठार झाल्या, तर सुकवद (ता. शिंदखेडा) गावशिवारात रखवालदारच्या झोपडीवर वीज कोसळून संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या. वाठोडे (ता. शिरपूर) येथेही आज दुपारी वीज कोसळून महिला ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. 

गव्हाणेत मायलेकी ठार 
गव्हाणे येथे आज दुपारी तीनच्या सुमारास येथील सुरेखाबाई दगडू पाटील (वय 50) व लहान मुलगी राणी दगडू पाटील (वय 18) शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या असता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यात वीज कोसळून मायलेकी जागीच ठार झाल्या. तत्पूर्वी, पावसामुळे सुरेखाबाई व राणी शेताबाहेर निघाल्या. त्या मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत गव्हाणे फाट्यावर झाडाखाली थांबल्या असताना वीज कोसळून जागीच ठार झाल्या. सुरेखाबाईंच्या मागे पती, दोन विवाहित मुली व मुलगा आहे. सुकवद गावशिवारात येथील सरपंच सर्जेराव पाटील यांच्या शेतातील रखवालदार यांच्या झोपडीवर दुपारी तीनच्या सुमारास वीज कोसळून झोपडीतील संसारोपयोगी वस्तू खाक झाल्याने आदिवासी कुटुंब रस्त्यावर आले. 

वाठोडेत महिला ठार 
वाठोडे शिवारात गजेंद्र राजपूत यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू होते. विजा चमकू लागल्याने मजुरांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. मात्र आश्रय शोधण्यासाठी पळताना वीज अंगावर पडून हुकूबाई दारासिंग पावरा (वय 26) जागीच ठार झाली. तिच्यासोबत असलेला पती दारासिंग पावरा (32) गंभीर जखमी झाला.

Web Title: dhule news women death by lightning colapse